Woman Attempts Risky Reel On Her Rooftop Standing On Unstable Bricks Before Falling The Incident Captured Camera And Quickly Going Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

रील्ससाठी छतावर चढली महिला अन् पाय घसरून पडली; धक्कादायक घटना मोबाईलमध्ये कैद

Shocking Reels: महिला छतावर रील शूट करत असताना विटांवर उभी राहून पडली. हा अपघात मोबाईलमध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावरील धोकादायक ट्रेंड्स आणि अशा स्टंट्समुळे होणाऱ्या दुर्घटनांचा इशारा मिळाला आहे.

Tanvi Pol

Reels Gone Wrong: सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सध्या तरुणाईमध्येच नव्हे तर सर्व वयोगटांमध्ये जोरात पाहायला मिळत आहे. बरेचजण इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल प्रयत्न करताना दिसतो. मात्र, केवळ काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी किती मोठा धोका पत्करला जातो, याचे जिवंत उदाहरण पाहण्यासाठी मिळालं आहे.घराच्या छतावर रील्स करताना त्या महिलेचा पाय घसरून ती थेट खाली कोसळली. विशेष म्हणजे संपूर्ण प्रकार तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

घटना नेमकी काय घडली?

ही धक्कादायक (Shocking) घटना नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजले नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते,नेहमीप्रमाणे तिने आपल्या घराच्या छतावर जाऊन एक रील शूट करण्याचे ठरवले. या रीलमध्ये स्वतःला उंचावर दाखवण्यासाठी आणि बॅकग्राउंड चांगलं दिसावं म्हणून ती काही विटा एकत्र रचून त्यावर उभी राहणार होती.

त्या क्षणी तिच्या हातात मोबाईल होता आणि ती टाइमर लावून शूटिंग सुरू करत होती.परत व्हिडिओ शुट करण्यासाठी पळत ती विटांवर उभी राहण्यासाठी आली. पण काही क्षणातच तिचा तोल गेला आणि ती विटांवर जोरदार आपटली जाते. सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे दिसत असून तिच्या बाजूला असलेल्या लहानग्याला काहीही झालेले नाही.

मोबाईलमध्ये कैद झालेला अपघात व्हायरल

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये जी महिला रील्स व्हिडिओ शूट करत होती सर्व अपघात तिच्याच मोबाईलमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावरही अपलोड करण्यात आलेला आहे. मग काय त्यावर नेटकरी वर्गातून अनेक लाईक्स, व्ह्यूज आणि प्रतिक्रियाचा पाऊस पडत आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : पाऊस अन् घनदाट जंगल, पुण्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन

Maharashtra Live News Update : साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार

Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पाऊस कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? VIDEO

Neha Kakkar: नेहा कक्करचा व्हायरल लाबुबू डॉल लूक पाहिलात का?

Beed : ऑनलाइन जुगारात पैसे बुडवले, कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला चोर; पोलीस अधीक्षक कार्यालयात केली होती चोरी

SCROLL FOR NEXT