पति पत्नी और वो, साहेब बीवी और गँगस्टर... यासारखे पती-पत्नी आणि विवाहबाह्य प्रेमप्रकरणारील चित्रपट तुम्ही पाहिले असतील. नवरा अथवा पत्नी आपल्या जोडीदाराला धोका देत असल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलेय. अशीच काहीशी घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशणधील महाराजगंजमधील या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. पती पोलीस शिपाई पदाची परीक्षा देण्यासाठी घरातून गेल्यानंतर पत्नीने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. त्यानंतर जे घडलं त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
खरं तर पती-पत्नीचं नातं (relationship)विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. पण उत्तर प्रदेशमध्ये याच नात्याला तडा गेल्याचं दिसले. पती घरातून बाहेर गेल्यानंतर पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं. घरातून विचित्र आवाज येऊ लागल्यानंतर या घटनेचा उलगडा झालाय. नेमकं काय प्रकरण आहे, याची का चर्चा होतेय?
नेमके काय घडले?
सध्या व्हायरल(Viral) होत असलेली घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील आहे. या भागात वास्तव्यास एक कुंटुब आहे. याच कुंटुबातील एक व्यक्ती यूपी पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेसंबंधित परीक्षेची तयारी करत होता. परीक्षा देण्यासाठी तो व्यक्ती घरातून ठरलेल्या नियोजनानुसार बाहेर गेला.
पती बाहेर पडल्यानंतर काही वेळात घरातील सदस्य रात्री झोपण्याची वाट पाहिली. ज्या वेळेस घरातील सदस्य झोपल्याचे समजताच पत्नीने प्रियकराला घरी बोलावले. मात्र मध्यरात्री घरातील काही सदस्यांना सूनेच्या खोलीतून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. घरातील सदस्यांना या विचित्र आवाजाने सूनेची चिंता वाटू लागली, त्यामुळे त्यांनी त्या महिलेच्या खोलीच्या दिशेने गेले. खोलीचा दरवाजा उघडला असता,त्यांना त्या आपली सून तिच्या प्रियकरासोबत (boyfriend)नको त्या अवस्थेत आढळून आली.
घरातील सदस्य सूनेला काही बोलण्या अगोदरच त्यांनी तत्काळ तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरुन बंद करुन घेतला. जेणेकरुन ती किंवा तिचा प्रियकर घरातून पळून जाऊ नये. मग काय दोघेही घरातील सदस्यांच्या तावडीत सापडल्यानंतर तिच्या प्रियकराला बेदम मारहाण(beating) केली. काही वेळात पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिस या घडलेल्या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत. पण या प्रकरणाची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.