Delhi Metro Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: हे काय नवीनच! दिल्लीच्या मेट्रोमध्ये अचानक झाली 'ही' अनाऊंसमेंट; ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Delhi Metro Viral Video: दिल्लीच्या मेट्रोमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओत मेट्रोमध्ये करण्यात आलेली अनाऊंसमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिल्लीच्या मेट्रोमध्ये काही ना काही घडतच असतं. कधी वाद-विवाद, कधी डान्स तर कधी रोमान्स...असा एखादा दिवस फार क्वचितच जातो जेव्हा दिल्लीच्या मेट्रोमध्ये काही घडत नाही. नुकतंच असाच दिल्लीच्या मेट्रोमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओत मेट्रोमध्ये करण्यात आलेली अनाऊंसमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

दिल्लीच्या मेट्रोमध्ये एक खास अनाऊंसमेंट करण्यात आली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही अनाऊंसमेंट जीवनसाथी.कॉम द्वारे करण्यात आली आहे. ज्यामध्ये खासकरून अविवाहित मुलींना टार्गेट करण्या आलं आहे. या अनाऊसंमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे, अविवाहित मित्रांनो, जर तुम्ही लाईफ पार्टनर शोधत असाल तर जीवनसाथी.कॉम तुमच्यासाठी आहे. दरम्यान ही घोषणा ऐकताच मेट्रोमध्ये एकच हशा पिकला.

मेट्रोतील प्रवाशांना हसू अनावर

ही घोषणा ऐकून मेट्रोतून प्रवास करणारे लोक हसायला लागले. यावेळी काहीजण जोरजोरात हसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. ही घोषणा केवळ मनोरंजकच नाही तर मजेशीर मार्गाने पार्टनर शोधण्याचा संदेशही देतेय.

दिल्ली मेट्रोमध्ये अशी घोषणा होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. मेट्रोमध्ये यापूर्वीही अनेकवेळा मजेशीर घोषणा करण्यात आल्या होत्या. यावेळी या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेलं.

Jeevansathi.com ने प्रमोशनचा करण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक अनोखा अनुभव होता, जो ते कधीच विसरणार नाहीत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एका व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखोपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. 81 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक्स देखील केलंय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यांच्या स्टोरीजमध्येही पोस्ट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT