Wedding Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Fight Video: बिर्याणीमध्ये लेगपीस नव्हता म्हणून भरलग्नात तुफान राडा; खुर्च्या फेकून फ्री स्टाईल हाणामारी; VIDEO VIRAL

Wedding Fight Over Leg Piece: लग्न म्हटल्यावर लहान मोठी भांडणे होत असतात. परंतु तुम्ही लग्नात कधी हाणामारी होताना पाहिलंय का? लग्नात बिर्याणीत लेगपीस नव्हता त्यामुळे वऱ्हाडीमंडळींमध्ये मारामारी झाली आहे.

Siddhi Hande

लग्न म्हटल्यावर नेहमी गडबड, गोंधळ हा होतोच. अनेकदा तर लहान- मोठी भांडणेदेखील होतात. अशाच लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओत डान्स, गाण्याचे असतात. तर अनेक व्हिडिओ जेवणाचे असतात. लग्नात जेवणात शाही भोजन असते. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी जेवणावर तुटून पडतात. परंतु जर जेवणात काही कमतरता असेल तर नातेवाईक सगळ्यांना सांगत बसतात. परंतु आता एका लग्नात जेवणात चिकन लेगपीस नसल्याने जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही बाजूचे वऱ्हाडी मंडळी मारामारी करत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत लग्नातील जेवणाच्या टेबलजवळ नातेवाईकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वजण जेवण जेवत होते. परंतु एका बाजूला अचानक गडबड- गोंधळ होतो. या गोंधळाचे कारण म्हणजे चिकन बिर्याणीत लेगपीस नव्हते. चिकन बिर्याण हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. परंतु याच बिर्याणीत जर लेगपीस नसेल तर कसं होणार? परंतु लेगपीस नसल्याने जोरजोरात हाणामारी झाली. खूप लोक एकमेकांना मारताना दिसत आहे.लाथा-बुक्क्या, खुर्च्या फेकून एकमेकांना मारताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथील आहे. बरेलीमधील एका लग्नात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Arj6n या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर लेगपीसवरुन भरलग्नात भांडण झाल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

Kitchen Hacks : फ्रीज घाणेरडा आणि पिवळा पडलाय? 'या' टिप्स वापरून पुन्हा करा नव्यासारखा चकचकीत

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता

Dark Underarms Tips: काखेतला काळवटपणा घालवण्यासाठी या 5 टिप्स आजपासूनच फॉलो करा

NCP Reunion: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांची इच्छा; १२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता, शरद पवारांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT