Wardha News Saam TV
व्हायरल न्यूज

Wardha Birthday Celebration: केक कापताना स्प्रे मारल्याने आगीचा भडका उडाला; बर्थडे बॉयचं तोंड भाजलं, VIDEO व्हायरल

Face Caught Fire While Cutting the Cake: धिंगाणा घालत वाढदिवस साजरा करणं एका मुलाच्या चांगलच अंगलट आलंय.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Birthday Celebration in Wardha: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस फार खास असतो. या दिवशी सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक आपल्याला शुभेच्छा देतात. घरी गोड जेवण बनवलं जातं. मात्र अलिकडच्या काळात तरुण मुलं हुल्लडबाजी करत वाढदिवस साजरा करताना दिसतात. असाच धिंगाणा घालत वाढदिवस साजरा करणं एका मुलाच्या चांगलच अंगलट आलंय. (Latest Marathi News)

तरुण मुलं -मुली एकत्र येत रस्त्यावर गाजावाजा करत वाढदिवस साजरा करतात. स्प्रे आणि फायर गन उडवत धिंगाणा घालतात. अशी मस्ती तरुणाच्या अंगाशी आली असून केक (Cake) कापताना त्याच्या तोंडालाच आग लागली आहे. रितीक वानखेडे असं बर्थडे बॉयचं नाव आहे. तो किरकोळ जखमी झालाय. तोंडाला आग लागल्याची घटना एका मुलाने कॅमेऱ्यात कैद केलीये.

वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. केक कापताना स्प्रे तोंडावर मारताना 'फायर गन' मधून ठिणगी पडल्याने आग लागली आहे. जखमी झाल्यानंतर तरुणाने तात्काळ वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले. कान आणि नाकाजवळ त्याला किरकोळ जखम झाली आहे. आगीवर वेळीच नियंत्रण आल्याने तोंड जळता जळता थोडक्यात बचावलेय.

दरम्यान, बर्थडे बॉयच्या तोंडाला आग (Fire in the Face) लागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. काल रितीकचा वढदिवस होता. जसे सर्व मित्रांचे वाढदिवस साजरे केले गेले त्याच प्रमाणे त्यालाही मित्रांनी सेलिब्रेशनसाठी बोलावले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण आपल्या मित्रांसोबत केक कापत आहे.

यावेळी त्याच्या मित्रांनी सुरुवातीला त्याच्या तोंडावर स्प्रे फवारला. त्यानंतर त्यांनी फायर गन देखीव हवेत उडवली. फायर गनच्या काही ठिणग्या त्याच्या तोंडावर पडल्या. चेहऱ्यावर स्प्रे असल्याने त्याच्या झपकन आग लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT