Mumbai Fire: ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Mumbai Fire: ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.
Breaking Mumbai Fire
Breaking Mumbai FireSaam TV
Published On

रुपाली बडवे

Trident Building Fire: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मरीन ड्राईव्हवर परिसरातील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोळ पाहायला मिळाले. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीच्या टेरेसवरून धुराचे लोळ बाहेर पडताना दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

Breaking Mumbai Fire
Wradha News: वर्धा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित; वेळेसोबतच कागदांचीही मोठी बचत

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे 6:50 ते 7:10 च्या घडली. मरीन लाईन्स परिसरातील हॉटेल ट्रायडेंटच्या वरच्या मजल्यावरून अचानक काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंगसाठी जमले होते. (Mumbai News)

मॉर्निंगसाठी आलेल्या काही लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Breaking Mumbai Fire
Biparjoy Cyclone: मुसळधार पाऊस, 500 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित, शेकडो घरांची पडझड...राजस्थानात हाहाकार

हॉटेलमधून धूर निघत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीला आग लागली नसल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. "ही आगीची घटना नव्हती तर एक चिमणीतून थोडा धूर निघत होता आणि आग लागल्यासारखं वाटत होतं. आम्ही आमच्या टीमलाही घटनास्थळी हलवलं पण तिथे काहीच नव्हतं, आम्ही अजूनही घटनास्थळीच आहोत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com