Viral VIdeo: हल्ली लोकांना चालता बोलता कधीही आणि कुठल्याही रुपात मृत्यू येवू शकतो. अशी असंख्य उदाहरणे आपल्याला आपल्या अवती भोवती पाहायला मिळतात. कधी ह्रदयविकाराचा धक्का तर कधी अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना कानावर येत असतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. या व्हिडिओमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागल्याचे दिसत आहे. (VIral Video News In Marathi)
विजेच्या तारा आणि वस्तूंपासून काळजी घेण्याचे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. कारण वीजप्रवाह सुरू असताना या वस्तूंच्या जवळ जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. काही दिवसांपूर्वीच हायपर टेंन्शन वायरला स्पर्श झाल्याने ६ मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याला काम करताना विजेचा धक्का लागल्याचे दिसत आहे. या धक्का इतका जोरात आणि भयंकर होता की, या कर्मचाऱ्याची जाग्यावर जळून राख होते. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. (Latest Marathi News)
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन साफ करत असल्याचे दिसत आहे. यासाठी लांब लोखंडी काठीवर कापड लटकवून तो प्रत्येक कोपऱ्यातून ट्रेन साफ करत आहे. मात्र काठीची लांबी इतकी आहे की तो वरील हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात येऊ शकते. ट्रेन साफ करताना व्यक्तीच्या हातातील काठी हाय व्होल्टेज वायरला धडकते आणि अचानक करंट लागल्याने त्या व्यक्तीची क्षणात राख होते.
ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही. @cctvidiots नावाच्या युजरने ट्विटरवर ही क्लिप पोस्ट केली आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.