सोशल मीडियावर मुंबईतील लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मुंबईपासून ते उपनगरातील अनेक सामान्य व्यक्ती कामावर जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. उपनगर आणि मुंबई शहरातील दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे यामुळे लोकल ट्रेनमध्येही प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालेली आहे.
या सर्वामुळे लोकल प्रवाशांना दरवेळी भयानक गर्दीचा सामना करावा लागतो. लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे अनेक व्यक्ती जिवावर उदार होऊन प्रवास करतात. या भिषण गर्दीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,अशातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक लोकल ट्रेनच्या गर्दीचे भीषण वास्तव्य दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ बऱ्याचदा ट्रेनमध्ये (Train)चढण्यासाठी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. अनेकदा या गर्दीत चढताना काही व्यक्ती पडतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. पंरतू आता याच लोकलच्या गर्दीतून प्रवाशांना आता लोकलमधून उतरण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. सध्या सोशल मीडियावर याचा प्रत्यय दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत(Video) तुम्हाला एक रेल्वेचे स्टेशन दिसून येत आहे. मात्र या स्टेशनवर एक प्रवाशांनी भरलेली लोकल ट्रेन येते. मात्र या ट्रेनमधून एका व्यक्तीला उतरण्यासाठी कोण जागा देत नाही. एका बाजूला अनेक प्रवाशी अनेक ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर सारख्याच वेळेला ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एक प्रवासी आहे ज्याला उतरण्यात कोणीही जागा देत नाही. शेवटी तो ट्रेनमधून खाली उतरताना जमिनीवर पडतो. स्टेशनवरही आपल्याला अनेक प्रवाशांची गर्दी दिसून येतेय.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे मात्र हा व्हिडिओ कुठल्या स्टेशनवरील(Station) आहे हे समजू शकलेले नाही. व्हिडिओला आता पर्यंत लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लाईक्स मिळाले आहेत.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजरने प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील पहिला यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे,'हे तर रोजचे आहे'तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की'आम्हीपण अशाच गर्दीतून जातो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.