Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: 'मॅगी घ्या, मॅगी...'भाजीसारखी मॅगीची चक्क हातगाडीवर विक्री,व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Maggi Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क दुकानात पाकिटमध्ये मिळणारी मॅगी रस्त्यावर एका हातगाडीवर मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maggi Ka Thela

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या लहानपणाच्या असंख्य अशा आठवणी असतात. या आठवणी कधी कोणत्या व्यक्तीशी संबंधित असतात तर कधी कोणत्या वस्तू किंवा जागेशी. त्यातील एक म्हणजे सर्वांच्या आवडीची मॅगी. अवेळी लागलेली भूक आणि लवकरात लवकर होणारा पदार्थ यासाठी सर्वांना पहिले आठवते ते मॅगी(Mmaggie).अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात चक्क दुकानात पाकिटमध्ये मिळणारी मॅगी रस्त्यावर एका हातगाडीवर मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती बाजारात एक हातगाडी घेऊन येत आहे. मात्र त्यावर कोणताही भाजीपाला नसून चक्क मॅगी दिसत आहे.पण आजपर्यंत आपल्यापैंकी सर्वांनी मॅगी ही पाकिटमध्ये मिळणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या पॅकेटमधून आणली असेल.मात्र या बाजारात हा व्यक्ती एका हातगाडीवर सुट्टी मॅगी विकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Platform)इन्स्टाग्रामवरील chatore_broothersया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.मात्र हे नक्की भारतात व्यक्ती काय करतील काही सांगता येत नाही.याआधीही सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हायरल व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की, 'काय रे भाऊ कसं सुचलं हे' तर काही यूजरने मॅगी चांगली तर आहे ना?' व्हिडिओला ८ हजारोंहून अधिकचे लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवासी ट्रॅकवर उतरले

Besan Ladoo Recipe: दिवाळीला खमंग बेसनचे लाडू बनवणार आहात? 'ही' ट्रिक वापरा, लाडू वळताना तुटणार नाहीत!

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठा बदल! २४, २२ आणि १८ कॅरेटचे नवे भाव वाचा

Rahul Gandhi Accident : राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची जोरदार धडक

Face Wash : दिवसातून किती वेळा फेसवॉशने चेहरा धुवावा? ग्लोइंग स्किनसाठी फेसवॉश किती वापरावा?

SCROLL FOR NEXT