Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणाचा अजब कारनामा! रस्त्याच्या मधोमध उभं राहून रील्स शूट; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ जरी धक्कादायक असला तरी व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून संताप करण्यात आला.

Tanvi Pol

Reels Video: गेल्या काही वर्षात तरुण-तरुणींमध्ये सोशल मीडियाचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं त्यांना काळाची गरज वाटू लागली असून प्रसिद्धीसाठी काहीही करण्यास तयार होतात. त्यात कधी धोकादायक ठिकाणी स्टंट असेल तर कधी रील्ससाठी जीवाची पर्वा न करता फोटोज काढतात, त्यात सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात त्याने रस्त्याच्या मधोमध रिल्स व्हिडिओ शूट केला मात्र त्यानंतर काय घडले ते एकदा पहा.

नेमके काय घडते?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला वाहनांची ये-जा होत असलेला रस्ता दिसत आहे. काही वेळात या रस्त्यावर एक तरुण येतो आणि दोन्ही रस्त्याच्या मधोमध रील(Reel) स्टैंड उभा करतो,त्यानंतर त्या रील स्टैंडवर मोबाईल व्यवस्थित ठेवून कॅमेरा ऑन करतो. रिल बनवण्यासाठी तो कॅमेरा चालू केल्यानंतर काही अंतर लांब जातो आणि रस्त्याच्या मधोमध चालत येऊन रील्स बनवत असतो. व्हिडिओत पाहिले तर रील्समध्ये व्यस्त असलेल्या त्याच्या बाजून वेगात वाहनांची ये-जा होत आहे,मात्र कोणतीही भिती न बाळगता तो रील्स शूट करत असतो, मात्र काही वेळात तिथे एक पोलिसांचे वाहन येते, असे सर्व व्हायरल व्हिडिओत आहे. सर्व व्हिडिओ त्या परिसरात असलेल्या एका व्यक्तीने लांबून शूट केलेला आहे.

तरुणाचा रील्स व्हिडिओ 'एक्स' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ १० तासापूर्वी ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''रील टू रिअल लाईफ इडियट्स ऑन रोड'',असे लिहिले आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही तासात लाखोचे व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे तर अनेक लाईक्सही व्हिडिओला मिळाले आहेत.

एवढेच नाही तर तरुणाचा संतापजनक व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झालेच आहे मात्र अनेक प्रतिक्रियाही कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अशांना पोलिसांना चापकवलं पाहिजे'',तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''गरज काय असते'', तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT