Sharad Kapoor : 'घरी बोलावलं अन्...' शरद कपूरवर रील स्टारकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल

Sharad Kapoor Harassment Case : शरद कपूर विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.
Sharad Kapoor Harassment Case
Sharad KapoorSAAM TV
Published On

शरद कपूर (Sharad Kapoor) विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथील एका रीलस्टार तरुणी ही तक्रार पोलीसांना केली आहे. या गुन्ह्याची तक्राराल बुधवारी रात्री करण्यात आली.

तक्रार करणारी तरुणीचे प्रॉडक्शन हाऊस असून ती रीलस्टार आहे. तिचा सोशल मीडियावर चाहता वर्ग आहे. तिने शरद कपूरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने तक्रारीत म्हटलं की, "अभिनेता शरद कपूर तिला गेल्या तीन महिन्यांपासून फेसबुकवर मेसेज करत आहे. यांनी २६ नोव्हेंबरला व्हिडीओ कॉल आला. यात शरद कपूर यांनी तिच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने तिला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहिले होते. कामासंबंधित बोलण्यासाठी त्याने तिला त्याचे ऑफिसमध्ये बोलावले. त्यासाठी आपला मोबाइल नंबर पत्ता दिला. तेव्हा त्या पत्त्यावर ती तरुणी पोहचली. तेव्हा तिला समजले की, ते ऑफिस नसून त्याचे घर होते. "

पुढे तिने तक्रारीत म्हटलं की , "रीलस्टार तरुणीला शरद कपूरने अश्लील फोटो आणि काही लिंकही पाठवल्या होत्या. तसेच एक व्हॉईस नोटही पाठवली. त्या व्हॉईस नोटमध्ये खूप घाण भाषा वापरण्यात आली. "

दुसरीकडे शरद कपूरने हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की, मी कथित घटनेवेळी न्यूयॉर्कमध्ये होतो. मी असे चुकीचे काम करत नाही. तसेच मी या तरुणीला ओळखत नाही. तसेच त्यांनी लैंगिक छळाचा आरोपही फेटाळला आहे.

Sharad Kapoor Harassment Case
Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'जीवन गौरव पुरस्कार', पाहा PHOTOS

पोलिसांनी अजूनही शरद कपूरला अटक केली नसून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगणारी नोटीस पाठवली आहे. असे पोलिसांनी सांगितले. शरद कपूरने अनेक चित्रपटात काम केले आहे. यात जोश, लक्ष्य, दस्तक या चित्रपटांचा समावेश आहे.

Sharad Kapoor Harassment Case
Poonam Pandey: दुसऱ्या लग्नाच्या चर्चांवर पून पांडेने सोडलं मौन, म्हणाली, लग्न करणे ही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com