नक्षलवादाने ग्रासलेल्या आणि जंगलांनी व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता रानटी हत्तींचा आणखी एक धोका उभा राहिला आहे. आज पहाटेच्या सुमारास दोन टस्कर हत्ती गडचिरोली शहरात शिरल्याने एकच खळबळ उडाली. इंदिरानगर, लांझेडा, रामनगर व रेड्डी गोडाऊन चौकात हे हत्ती मुक्तपणे फिरताना दिसले आणि काही तास शहर थरारात गढले.
नागरिक सकाळच्या फिरस्तीसाठी बाहेर पडत असताना अचानक समोर रानटी हत्ती दिसल्याने एकच धावपळ उडाली. हा थरार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर अपलोड केला असून पाहता पाहता व्हिडिओ(Video) व्हायरल झाले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरी भागात वन्यजीवांचा असा उघडपणे वावर ही पहिलीच वेळ असल्याने चिंता वाढली आहे.
2018 पासून ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील जंगलातून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा वावर सुरु झाला आहे. आतापर्यंत शेतपिकांचे नुकसान, घरे उद्ध्वस्त करणे, आणि काही घटनांमध्ये मानवी बळीही गेले आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात हत्तींचा वावर ही गंभीर बाब आहे. वनविभागाच्या यंत्रणा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सदर हत्ती(elephants) सध्या गुरवळा जंगलात गेल्याची माहिती मिळत आहे, मात्र ते पुन्हा शहरात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.