Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Women Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन महिलांचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महिलांनी केलेला स्टंट अतिशय धोकादायक पद्धतीचा आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या दोन महिलांचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या दोन महिला खोल विहिरीत धोकादायक पद्धतीने झोपाळा बांधून स्टंट करत आहेत. जो स्टंट सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे. एवढेच नाही तर व्हायरल व्हिडिओत काय झाले ते तुम्ही पाह.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक मोठ्या आकाराची शिवाय अतिशय खोल अशी विहिर दिसत आहे. ज्यात तुम्ही पाहिले तर अर्धी विहिर पाण्याने भरलेली आहे. अशातच दोन महिला चक्क विहिरीमध्ये झोपाल्यावर बसलेल्या दिसत आहे. त्यांनी चारही बाजूने खोल विहिरत झोपाला बांधला आहे. व्हिडिओतील एक महिला वयोरुद्ध दिसत आहे तर दुसरी महिला तरुण दिसत आहे. जर तुम्ही पाहिले तर अतिशय धोकादायक(Dangerous) पद्धतीने झोपाल्यावर त्या झुलत आहे. जर चुकूनही झोपाल्याची दोरी तुटली तर दोघींही खोल पाण्यात बुडून जातील. त्या महिलांचा व्हिडिओ विहिरीच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

या महिलांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''virjidhabhi'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. ३ नोव्हेंबर रोजी व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला असून तब्बल या दिवसात लाखोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.

इन्स्टाग्राम शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेले असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बाबा या महिला काय करतील सांगता येत नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''दोरी तुटली तर तिथे समाधी निर्माण होईल'' तर तिसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की,''यमराज तुम्हा दोघांची वाट पाहत आहेत''अशा अनेक गमतीदार तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT