Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईsss महिलांची घराबाहेर तुफानी हाणामारी, काठीने एकमेकींना मारलं, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात काय हा प्रकार!

Viral Video News: सध्या महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिलांचा गट एकमेंकिना जोरदार मारताना दिसत आहेत.

Tanvi Pol

Womens Fighting Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कधी भयानक घडलेले अपघात असतात तर कधी तुम्हाला तरुणांच्या हाणामारीचे हैराणजनक व्हिडिओ पाहण्यास मिळतील, सध्या सोशल मीडियावरही हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र तो कोणत्या तरुणांच्या गटाची हाणामारी नसून भररस्त्यात काही महिलांची तूफान हाणामारी होताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही एका रस्त्यावर महिलांचा गट पाहू शकता शिवाय अनेक नागरिकही रस्त्यावर जमलेले आहेत. मात्र व्हिडिओत पुढे या सर्व महिला एकमेंकाना मारताना दिसत आहे परंतू त्यांच्या हातामध्ये चक्क काठ्या आहेत त्याने एकमेंकीना मारत आहे. अगदी रस्त्यावर झोपून एकमेंकीना मार आहेत. नक्की महिलांच्या हाणामारीचे(Fighting) कारण समजू शकलेले नाही, मात्र त्याच परिसरातील एका व्यक्तीने सर्व प्रकार मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्सवरील '@NCMIndiaa' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तब्बल हजारोंच्या संख्येने व्हिडिओ लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''महिलांना नाद खुळा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नक्की कारण तरी काय'' तर अनेकांनी हैराणजनक तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

SCROLL FOR NEXT