Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! विमानात प्रवाशांच्या डोक्यावर आढळला साप; घटनेचा थरारक व्हिडीओ

Flight viral video: बँकॉकहून फुकेतला जाणाऱ्या एअरएशियाच्या देशांतर्गत विमानात एक साप आढळून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Snake Found In Flying Plane

सध्या व्हायरल व्हिडिओमध्ये विमान प्रवासामधल्या वादविवादाच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी सहप्रवाशांमध्ये सीटवरुन हातापायी होते तर कधी विमान कर्मचाऱ्यांशी वादावादी होते. अशातच विमानातळा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे,ज्यामध्ये बँकॉकहून फुकेतला जाणाऱ्या एअरएशियाच्या देशांतर्गत विमानात एक साप आढळून आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साप म्हटलं की चांगल्या चांगल्या व्यक्तीची नाकीनऊ उडते. घरात तसेच बाईकमध्ये तर कधी चक्क झोपण्याच्या ठिकाणी साप आढळून आला आहे तसेच फ्लाइटमध्ये साप आढळल्यानंतर अनेक प्रवासी संतप्त झाले तर काही घाबरुन गेले. ही घटना १३ जानेवारी दिवशी घडली आहे मात्र त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसते की, विमानाच्या आत असलेल्या लगेज केबिनजवळ एका साप दिसून आला आहे. साप बाहेर आल्यानंतर सर्व प्रवाशी घाबरलेले दिसत आहेत. काही वेळानंतर एक क्रु मेंबरने आधी सापाला बाटलीत पकडण्याचा प्रयत्न केला अन् तो यशस्वी झाला. सापाला यानंतर एका मोठ्या पिशवीत ठेवण्यात आले आणि विमानाची लॅंडिग होऊ पर्यंत एका कपाटात बंद करुन ठेवण्यात आले.

व्हायरल व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील @mothership या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सध्या व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT