IndiGo: विमानाचं विंडो सीट घेणं महागलं; फ्रंट-विंडो सीटसाठी मोजावे लागतील तब्बल इतके रुपये

Indigo Seat : विमानात आवडती सीट घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो. यासाठी सर्व एअरलाइन्सचे दर वेगवेगळे असतात. दरम्यान इंटरग्लोब एव्हिएशनने इंडिगो विमान कंपनी विकत घेतलीय.आता कंपनीने नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत.
Indigo Seat
Indigo SeatSaam Tv
Published On

Indigo Seat Selection Charge:

विमानातून प्रवास करताना अनेकजण आपल्या आवडीची सीट घेण्यास प्राधान्य देत असतात. परंतु विमानात आवडीची सीट घेणं महागणार आहे. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी एअरलाइन्सपैकी आहे. या एअरलाइन्स कंपनीने नवीन वर्षाचे नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत. विमानात आवडती सीट घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो. यासाठी सर्व एअरलाइन्सचे दर वेगवेगळे असतात. (Latest News)

दरम्यान इंटरग्लोब एव्हिएशनने इंडिगो विमान कंपनी विकत घेतलीय. यात कंपनीने नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत. जर एखाद्या प्रवाशाला फ्लाइटच्या पहिल्या रांगेत पहिली सीट घ्यायची असेल तर त्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील. ४ जानेवारी २०२४ ला इंडिगोने इंधनावरील अधिभार मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयानंतर कंपनीने सीट चार्जमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. इंडिगोच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयी माहिती देण्यात आलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान तिकीट दर वाढीचे नियम हे २३२ सीट A321 प्लाइट आणि १८० सीटवाल्या A320प्लाइटसाठी लागू नसणार आहेत. दरम्यान इंडिगोने ४ जानेवारीला इंधन अधिभार शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला. एअरलाइनने गेल्या वर्षी ऑक्‍टोबर 2023 पासून इंधन शुल्क लागू केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एटीएफच्या किमती वाढल्यानंतर विमान कंपनीने हा निर्णय घेतला होता.

Indigo Seat
Viral Video : विमान हवेत उडत असताना खिडकीच तुटली, त्यानंतर जे घडलं पाहून थरकाप उडेल, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com