अलास्का एअरलाइन्सचे प्रवासी मोठ्या अपघातातून बचावले आहेत. अलास्का एअरलाईन्सचं विमान हवेत उडत असताना खिडकीचा काही भाग अचानक हवेत उडला. त्यानंतर वेगाने हवा विमानात शिरत होती. संभाव्य धोका टाळण्यासाठी विमानाचं पोर्टलँड विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. पण लोकांच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्टपणे दिसत होती. या घटनेचे काही व्हिडीओ देखील आता समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 5 जानेवारीच्या रात्री हा प्रकार घडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या घटनेनंतर विमानात तणावाचं वातावरण दिसत होतं. विमानात प्रवाशांनी ऑक्सिजन मास्क घातलेले आणि सीट बेल्ट घट्ट बांधल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमान हवेत असताना खिडकीतून वारा वाहत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमान 16,000 फूट उंचीवर पोहोचले असताना देखील सुरक्षितपणे परत आले. (Latest News)
मिळालेल्या माहितीनुसात, अलास्का एअरलाइन्सचे फ्लाइट AS1282 हे विमान पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कॅलिफोर्नियातील ओंटारियो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. शुक्रवारी संध्याकाळी 4.40 च्या सुमारास विमानाने उड्डाण केले आणि 5.30 वाजता इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.या घटनेत प्रवाशांचे मोबाईल फोन हरवले. घटना घडली त्यावेळी विमानातून 174 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
याप्रकरणी अलास्का एअरलाइन्सने सांगितले की, आम्हाला फ्लाइट क्रमांक AS1282 शी संबंधित एका घटनेची माहिती आहे. जसजशी ती उपलब्ध होईल तसतसे आम्ही अधिक माहिती शेअर करू. अलास्का एअरलाइन्सने प्रवाशांना आपल्या ठिकाणांवर पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.