मोबाईलचा अति वापर कायमच व्यक्तींच्या अगंलट आला आहे. अनेक जण मोबाईल फोनवर बोलत असताना किंवा चॅटिंग करताना रस्त्यावर चालत असतात. रस्त्यावरुन जात असताना चालता चालता त्यांची दिशा कधी बदलते याचाही त्यांना भान राहिलेला नसतो तर कधी निष्काळजीपणामुळे अनेक व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागतो.अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवी मुंबईत निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर अपघांताचे सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
एका क्षणात होत्याच नव्हतं झालं...
व्हायरल होत असलेला व्हिडित दिसत आहे की, एक व्यक्ती मोबाईल फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे दिसते. त्याला समोरच्या फलाटावर जायचे होते.जवळच्या ब्रिजवरुन न जाता तो मोबाईलवर बोलत असताना रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो मोबाईल फोनवर बोलण्यात इतका व्यस्त असल्याने तसाच रेल्वे रुळावर उतरतो परंतू त्याला त्याच क्षणी रेल्वे रुळावर येणारी ट्रेन लक्षात आली नाही.या निष्काळजीपणामुळे या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
सर्व धक्कादायक घटना नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकातील आहे. याआधीही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि त्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेत. व्हायरल झालेले फुटेज सोशल प्लॅटफॉर्मवरील @@News18lokmat या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.
व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे,'लोक आता मूर्ख झालेत..अरे प्रत्येकाने ठरवा मोबाईल फोन आला की एका निवांत जागी उभे राहून बोला.बोलणे पूर्ण झाल्यानंतरच पुढे मार्गी व्हा..ही सवय आंगी लाऊंनच घ्या' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'ओव्हरस्मार्ट'अशा विविध स्तरातून यूजरच्या प्रतिक्रिया येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.