व्हायरल न्यूज

Viral Video: भरधाव तेलाचा टँकर अचानक उलटला; तेल घरी नेण्यासाठी नागरिकांची गर्दी,VIDEO व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजी नगर वैजापूर मार्गावर खाद्यतेलाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला आहे. वैजापूर मार्गावरून हा टँकर जात असताना देवगाव रंगारी शिवारातचही घटना घडली. मात्र यावेळी परिसरातील नागरिकांना या निमित्ताने आनंद झाल्याचे पाहायला मिळालंय. पलटी झालेल्या टँकरमधून खाद्यतेल पळविण्यासाठी महिलांसह अनेक पुरुषांची झुंबज उडाली होती. एवढेच नाही तर परिसरातील अनेक नागरिकांनी टँकरमधून सांडलेले खाद्यतेल कॅनमधून पळविताना दिसत होते. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या नागरिकांच्या गर्दीत तुम्ही पाहिले तर एक मोठा टँकर रस्त्यावर पलटी झालेला आहे. मात्र या टँकरमधून मोठ्या प्रमाणात खाद्य तेल पसरले आहे. हे खाद्य तेल (oil) घरी नेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अनेक भाड्यांतून ते नेत आहे. एकीकडे राज्यात खाद्य तेलाच्या किंमती वाढलेल्या आहेत त्यात या नागरिकांना असे फुकट मिळाल्याने ते घरी नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरु आहे. सर्व प्रकार व्हिडिओमध्ये(Video_ एका व्यक्तीने कैद केलेला आहे.

सर्व व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@TanviPol116027'' शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''खाद्यतेलाचा टँकर उलटला; तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय हे नागरिक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' कमाल आहेत लोकं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanjay Munde: कृषी खातं साधंसुधं नाही, चांगलं झालं तरी लोकं कौतुकही करेना: धनजंय मुंडे

Dhule News : लाल मिरची, मसाल्यात केमिकल रंग भेसळ; पोलिसांच्या कारवाईत धुळ्यात रॅकेट उघडकीस

High Court News : 'याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही'; कोर्टाने ओढले ताशेरे

Marathi News Live Updates: खडकवासला धरणातून २५६८ क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू

Chandrashekhar Bawankule : 'हे लुटारूंचं सरकार'; बावनकुळे यांच्या संस्थेला सरकारने भूखंड दिल्यानंतर विजय वडेट्टीवार कडाडले

SCROLL FOR NEXT