Student Prank Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Student Prank Video: आधी धडकी भरवली मग सुखद धक्का; वाढदिवसाचं सरांना विद्यार्थ्यांकडून भन्नाट सरप्राइज

Students Prank Viral Video: शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देत असतात. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल वेगवेगळ्या प्रतिमा असतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Students Surprise Teacher On His Birthday Viral Video:

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते खूपच स्पेशल असते. शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देत असतात. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल वेगवेगळ्या प्रतिमा असतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षक रागीट आणि कडक शिस्तीचे वाटतात. तर काहींसाठी शिक्षक हे एका मित्रासारखे असतात. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांनी सरांच्या वाढदिवसानिमित्त प्रँक केला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सरांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना सरप्राइज द्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक प्लान केला. सर्वात आधी सरांना घाबरवले त्यानंतर त्यांना सरप्राइज दिले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत शाळेतील एका वर्गात मुलांचा ग्रुप भांडताना दिसत आहे. त्यामुळे इतर मुले घाबरुन शिक्षकांना बोलवून आणतात. त्यांना वर्गात भांडणे सुरु असल्याचे सांगतात. त्यानंतर सर या मुलांची भांडणे सोडवण्यासाठी जातात. मुलांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मुले बाजूला होतात. त्यातील एक मुलगा सरांना पुष्पगुच्छ देतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सरांसोबत एक मजेशीर प्रँक करुन विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. तसेच त्यांनी डान्सदेखील केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील एका बोर्डिंग स्कूलमधील हा व्हिडिओ आहे. class12drams या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT