ठाण्यातील एका पेट क्लिनिकमध्ये एका पाळीव श्वानाला क्लिनिक मधील दोन कर्मचारी लाथा बुक्क्यांनी मारहाण केलीय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल झालाय. या व्हिडिओची दखल घेत पॉज या प्राणीमित्र संस्थेने या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केलीय. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे केली.(Latest News)
हा व्हिडिओ व्हायरल होतास प्राणी मित्र संघटना आणि प्राणी मित्रांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केलाय. एका क्लिनिकमध्ये या श्वानाला मारहाण करत आहेत आणि त्यांनीच हा व्हिडिओ शूट करून फेसबुकवर टाकला,अशी माहिती पॉज या संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली. पाळीव श्वानाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पॉज संस्थेच्या संस्थापक निलेश भणगे यांना कॉल करण्यास सुरूवात केली.
भणगे यांना संपर्क या घटनेची माहिती दिली. यानंतर निलेश भगणे यांनी प्राणी क्लेश प्रतिबंध समिती ठाणे, महाराष्ट्र अनिमल वेल्फेअर बोर्ड, भारतीय पशुकल्याण बोर्ड, ठाणे कलेक्टर, ठाणे कमिशनर आणि ठाणे पशुसंवर्धन अधिकारी यांना या प्रकरणी ई-मेल पाठवले. त्यानंतर २४ तासांच्या आत या व्हिडिओची गंभीर दखल घेत या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाहीतर सर्व प्राणी मित्र रस्त्यावर येतील असा इशारा देखील भणगे यांनी दिला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच या क्लिनिकच्या बाहेर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी या इशाऱ्यात म्हटले. त्यानंतर कासारवडवली पोलीस अधिकाऱ्यांनी व्हेटिक शॉपला भेट देऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
परळमध्ये पाळीव कुत्र्याची निर्घृण हत्या
बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात लढणाऱ्या महिलेच्या पाळीव श्वानाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना परळ भागात काही दिवसांपूर्वी घडली होती. परळ परिसरातील मनपाच्या शाळेच्या आवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीला संबंधित महिलेने विरोध केला होता. याच्या रागातून मद्यविक्री करणाऱ्यांनी श्वानाची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील परळ परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेच्या पाळीव श्वानाची हत्या करण्यात आली. परळ भागात असलेल्या जगन्नाथ भातणकर मार्ग मनपा शाळेच्या आवारात त्यांच्या लाडक्या दत्तक श्वान राजाचा मृतदेह आढळला. मृतदेह पाहून श्वानाला निर्घृणपणे ठार केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.