Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : इंदुरीकर महाराजांसोबत नरहरी झिरवाळांनी घातली फुगडी, VIDEO व्हायरल

Narhari Zirwal And Indurikar Maharaj Dance Video: दिंडोरी येथील हरिनाम सप्ताह सुरु आहे. यानिमित्त इंदुरीकर महाराज आणि नरहरी झिरवाळ यांनी फुगडी घातली आहे.

Siddhi Hande

नाशिक येथे इंदुरीकर महारांजाच्या किर्तनात आमदार नरहरी झिरवाळ यांनी टाळ मृदृंगावर ठेका धरला. त्यांनी फुगडी खेळत किर्तनाचा आनंद घेतला आहे. नरहरी झिरवाळ आणि इंदुरीकर महाराजांनी एकत्र फुगडी घातली आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळांनी टाळ वाजवत ठेका धरला आहे. दिंडोरीमध्ये हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. याच हरिनाम सप्ताहात इंदुरीकर महाराजांचा किर्तनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आमदार नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. (MLA Narhari Zirwal Video)

हरिनाम सप्ताहदरम्यान नरहरी झिरवाळ आणि इंदुरीकर महाराज फुगडी खेळले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुरुवातीला इंदुरीकर महाराज आणि आमदार नरहरी झिरवाळ हे टाळ मृदृंगावर ठेवा धरत गोल फेऱ्यात नाचताना दिसत आहे.त्यानंतर ते दोघेही फुगडी खेळताना दिसत आहे. (Indurikar Maharaj-Narhari Zirwal)

दिंडोरीमधील या सप्ताह सोहळ्याला अनेक महिला उपस्थित होत्या. याआधीही लोकनृत्य करताना नरहरी झिरवाळ यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांनी अनेकदा पालखी सोहळ्यातदेखील ठेका धरला आहे. त्यांच्या लोकनृत्यावरील प्रेमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ हे विजयी झाले. नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणुक लढवत होते. ते मागील पाच वर्ष विधानसभा उपाध्याक्ष म्हणून कारभार सांभाळत होते. विधानसभा निवडणुकी झाल्या असून मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. मंत्रिपदासाठी नरहरी झिरवाळ यांची वर्णी लागू शकते. (Narhari Zirwal)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT