Reel Viral: तासनतास रील्स पाहिल्यानंतर स्ट्रोकचा धोका?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Reel Viral News : आता तुम्हाला सावध करणारी बातमी. तुमचा जीव मोबाईलवरच्या रिल्समध्ये गुंतला असेल तर ही सवय लगेच मोडून काढा. कारण रिल्स पाहण्याची ही सवय आरोग्यासाठी किती घातक आहे, हे सांगणारा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. आम्ही या मेसेजमधल्या दाव्याची पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.
Reel Viral
Reel Viral News google
Published On

सध्याचा जमाना मोबाईलचा जमाना आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुरफटून गेलाय. अनेकांना रिल्सचं अक्षरशः व्यसन लागलंय. लोक तासनतास रिल्स पाहण्यात व्यस्त असल्याचं दिसतं. मात्र ही सवय तुमच्या जीवावर बेतू शकतो. कारण सतत रिल्स पाहिल्यानं तुम्हाला स्ट्रोकचा धोका आहे इतकंच नाही तर हे व्यसन कँसरसारख्या आजाराला निमंत्रण देऊ शकतं असा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात..

व्हायरल मेसेज

मोबाईलवर तासनतास रिल्स पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सतत रिल्स पाहण्याच्या सवयीमुळे स्ट्रोक आणि क्रॉनिक पेनचा धोका आहे. त्यामुळे तुम्हाला अटॅक येऊ शकतो, कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो.

खरंतर लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण रिल्स पाहतात. त्यामुळे खरंच व्हायरल मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे ही सवय जीवघेणी ठरू शकते का? याची पडताळणी होणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं या मेसेजमधील दाव्याची पडताळणी केली. आपच्या व्हायरल सत्य टीमने केलेल्या रिसर्चमधून काय सत्य समोर आलं पाहा.

Reel Viral
Shocking Video: धक्कादायक... तरुणाच्या अंगावर अचानक आली बस, नशीब चांगले म्हणून वाचला; घटना सीसीटीव्हीत कैद

व्हायरल सत्य/ साम इन्व्हेस्टिगेशन

अलिकडेच लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. त्यातून मोबाइल, लॅपटॉप आणि टॅबलेटद्वारे सोशल मीडियात वेळ घालवणाऱ्या लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दलची धक्कादायक माहिती समोर आलीय. जे लोक तासनतास रिल्स पाहतात त्यांना स्ट्रोक और क्रॉनिक पेनचा धोका असल्याचं या रिसर्चमध्ये म्हटलंय.

Reel Viral
Viral News: तुम्हाला कळणार तुमच्या मृत्यूची तारीख? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

इतकंच नाही तर किशोरवयीन मुलांना सर्वाइकल स्पॉन्डिलाइटिसचा धोका असल्याचा दावा करण्यात आलाय. स्क्रिनिंग टाईम जास्त असलेल्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा लोकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सतत रिल्स पाहिल्याने कॅन्सर किंवा स्ट्रोकचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. त्यामुळे तुम्ही किंवा तुमची मुलं उठसूट हातात मोबाईल घेऊन वेळ घालवत असतील तर ही सवय मोडून काढा नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com