Viral News: तुम्हाला कळणार तुमच्या मृत्यूची तारीख? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Death Clock Viral Fact Check: तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख माहिती आहे का असा प्रश्न कोणी केला तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात आपल्या मृत्यूची अचूक माहिती मिळते असा दावा करण्यात आलाय.
Death Clock
Death Clock Viral Fact Check:Saam Tv
Published On

तुमचा मृत्यू कधी होईल? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर माहित नाही असंच असेल. पण तुम्ही देखील स्वत:च्या मृत्यूची अचूक तारीख आणि वेळ जाणून घेऊ शकता. हे आम्ही म्हणत नाही तर एका व्हायरल मेसेजमधून हा दावा करण्यात आलाय. खरंच तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकते का? जाणून घेऊयात व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

जन्म आणि मृत्यू या अशा दोन गोष्टी आहेत ज्याबद्दल कुणीच ठामपणे सांगू शकत नाहीत. मात्र एका व्हायरल मेसेजनं सोशल मीडियात खळबळ उडालीय. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारिख कळेल असा दावा करण्यात आलाय. या मेसेजमुळे लोकांमध्ये आपला मृत्यूची वेळ आणि तारिख जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीय तसच भीतीचं वातावरणही पसरलंय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलय पाहा.

Death Clock
Shocking Video: अबब! फिरत्या पाळण्यातून जोरदार पडली अन् लोखंडी जाळीत अडकून बसली; जत्रेतील थरार कॅमेऱ्यात कैद

व्हायरल मेसेज

तुम्ही कधी मरणार हे आता तुम्हाला जिवंतपणीच कळेल. संशोधकांनी एक असं डेथ क्लॉक तयार केलंय. ज्यात तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख आणि वेळ समेजल. या डेथ क्लॉकमधून तुमच्या मृत्यूचं कारणही कळेल.

सोशल मीडियात डेथ क्लॉथची बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. खरंच लोकांना आपल्या मृत्यूची तारीख समजू शकते का? अशा प्रकारे आपला मृत्यू जाणून घेणं शक्य आहे का? आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी केली. आम्ही याबाबत गुगलवर रिसर्चही केला. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

Death Clock
Viral Video: भाजी निवडत बसलेल्या आजी बाईवर माकडांचा हल्ला, ओढले डोक्याचे केस; VIDEO व्हायरल

डेथ क्लॉक हे एक ऍप्लिकेशन आहे. कॅलिफोर्नियातील वैज्ञानिक ब्रेंड फ्रेंसन यांनी या AI ऍपची निर्मिती केलीय. या एप्लिकेशनच्या माध्यमातून यूजर्सना त्यांच्या मृत्यूची तारीख आणि वेळ कळू शकते. 5 कोटी लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करून हे एप्लिकेशन बनवण्यात आल्याचा दावा ब्रेंड फ्रेंसन यांनी केलाय. ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला असलेले आजार तसच आरोग्याविषयक सर्व माहिती द्यावी लागेल. जुलैमध्ये हे एप्लिकेशन बनवण्यात आलं आणि विशेष म्हणजे आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी ते डाऊनलोड केलंय.

हे केवळ एक ऍप्लिकेशन आहे. ते बनवताना निर्मित्यांनी अभ्यासपूर्ण बनवल्याचा दावा केला असला तरी ते अचूक असेलच असं नाही. मृत्यूबाबत तंतोतंत माहिती देणारं कोणती यंत्रणा किंवा माध्यम नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत तुमच्या मृत्यूची तारीख सांगणारा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com