Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाबोsss...! नखं आहेत की काठी? सर्वात लांब नखं असलेली महिला पाहिलीत का? जाणून घ्या

Woman With The World's Longest Nails: सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात नक्की जे घडलं आहे ते एकदम आश्चर्यकारक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video: भारत नव्हे तर संपूर्ण जगात अनेक अतरंगी गोष्टी आहेत,ज्याची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. त्यातील काही गोष्टी माणसासंबंधित आहे तर अनेक गोष्टी निर्जीव आहेत. सध्या अशाच एका गोष्टीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून होत आहे. ज्यात तुम्हाला जगातील सर्वात लांब नखं असलेली महिला पाहण्यासाठी मिळेल. नक्की जगातील कोणती ही महिला आहे ते तुम्ही पुढील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पाहा.

महिलेच्या नखांचा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या व्हायरल होत आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला इन्स्टाग्रामवरील ''@brain.strike'' या अकाउंटवर ५ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच अनेक हजारोंच्या घरात लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्हिडिओला(Video) व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील काही यूजर्संनी लिहिले आहे की,''लोक काही करतील'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' भारीच'' तर अनेक यूजर्संनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

नक्की कारण तरी काय?

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत व्हायरल व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये महिलेने वाढवलेल्या नखांचे कारण सांगितले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''द वुमन विथ द वर्ल्डस लाँगेस्ट नेल्स" एका आईची कहाणी सांगते, जिने 27 वर्षांपूर्वी आपली मुलगी गमावल्यानंतर तिच्या दु:खाचा सामना करण्यासाठी नखे कापणे बंद केली. तिची मुलगी दर रविवारी नखे कापायची आणि आता तिचा रेकॉर्ड- तुटलेले नखे त्यांच्या अतूट बंधनाचे प्रतीक आहेत'' असे लिहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT