Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाबो...! बॉयफ्रेंडवरुन तरुणींमध्ये जोरदार कुटाकुटी,भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी हाणामारी; VIDEO व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींची हाणामारी सुरु आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हाणामारीचे कारण समजून जाईल.व्हिडिओ पुढे जे घडतं ते एकदा पहाच.

Tanvi Pol

Girls Fightig Video: मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी... हा डायलॉग गेल्या काही वर्षात तूफान व्हायरल झालेला होता.तुम्हालाही हा डायलॉग वाचल्यानंतर कधी कपल्समध्ये होत असलेली हाणामारी आठवते तर कधी बॉयफ्रेंडसाठी तरुणींची हाणामारी असते.सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात भररस्त्यात काही तरुणींची बॉयफ्रेंडच्या कारणावरुन तूफान हाणामारी झालेली आहे,मात्र नेमके पुढे काय घडते ते एकदा व्हायरल व्हिडिओत पहा.

तरुणाई वर्गात प्रेमप्रकरणावरुन अनेक भयानकर गोष्टी घडत असतात.बऱ्याचदा बॉयफ्रेंडसोबत प्रेयसी पकडली जाते आणि तिथेच तिची धुलाई होते,असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात आणि हे विषय नेटकरी वर्गात गंमतीचा भाग ठरले जातात आणि अशा व्हिडिओनां(VIDEO) नेटकऱ्यांची पंसती मिळते.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,रस्त्याकडेला काही तरुणी उभ्या आहेत.काही वेळानंतर त्या तरुणींमधील एका तरुणीशी बाकीच्या तरुणी वाद घालण्यास सुरुवात करतात.पाहता पाहता हा वाद चक्क हाणामारीचे स्वरुप धारण करतो.गाडीच्या बाजूला असलेल्या तरुणींपैकी एका तरुणीला दोन तरुणी मारण्यास सुरुवात करतात. एकजण तिचे हात पकडते तर दुसरी तिला मारण्यास सुरुवात करते.तरुणींचा भररस्त्यात सुरु असलेला राडा त्या परिसरात असलेले तरुण पाहत असतात शिवाय सर्व प्रकरण मोबाईलमध्येही कैद केलेले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सर्व व्हिडिओ 'एक्स' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@ssgoyalat''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये होत असलेल्या राड्याचे कारण सांगितले आहे.ज्यात लिहिले आहे,''प्रेमप्रकरणावरून चार मुलींमध्ये भांडण झाले''असे कॅप्शन लिहिले आहे.सध्या नेटकऱ्यांमधून व्हिडिओला अनेक प्रतिक्रियाही मिळत आहेत शिवाय मोठ्या संख्येने व्ह्यूज हाणामारीच्या व्हिडिओला मिळत आहेत.

टीप : तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT