Ulhasnagar News: सिगारेटचे पैसे मागितल्याने पानटपरीवाल्याला बेदम मारहाण; थेट डोकचं फोडलं; CCTV व्हायरल

Ulhasnagar Fight Viral Video: उल्हानसनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिगारेटचे पैसे मागितल्याने तीन तरुणांनी पानटपरीवाल्याला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये त्या दुकानदाराच्या डोक्याला मार लागला आहे.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam Tv
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून हाणामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक मारामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरमध्ये सिगारेटचे पैसे मागितल्याने टोळक्याने टपरीवाल्याला बेदम मारहाण केली आहे.

Ulhasnagar News
Viral Video: 'माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का..' भावाच्या कलेला तोडच नाय; Video एकदा पाहाच

सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिडलेल्या टोळक्याने पानटपरी चालकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यामध्ये चिडलेल्या टोळक्याने पानटपरीवाल्याला मारहाण केली. त्यांनी लाठ्या- काठ्या घेऊन त्याला मारले आहे.

सुनील प्रजापती, अनिल प्रजापती आणि सागर विश्वकर्मा हे खेमाणी येथील भारत मार्बलजवळील राय पान स्टॉलवर सिगारेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी सिगारेट घेतली आणि पैसे न देता तिथून निघून जाऊ लागले. त्यामुळे पानटपरी मालक रवींद्रनाथ राय यांनी त्यांच्याकडून पैसे मागितले. त्यावर या तिघांनीही राय यांना शिवीगाळ करत लाकडी बांबूच्या काठीने राय यांना मारहाण केली. यात राय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Ulhasnagar News
Viral Video: रेल्वे पोलिसाची 'गुंडगिरी', महिलेला चापट लगावली, व्हिडीओ व्हायरल

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे तिघे तरुण पानटपरीवाल्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. बांबू घेऊन त्याला मारत आहे. आजूबाजूला अनेक लोक उभे असल्याचे दिसत आहे.इतर लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते तरीही पानटपरी चालकाला मारत होते. या घटनेने उल्हासनगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Ulhasnagar News
Viral Video: ''नथीचा नखरा नऊवारी साडी'' चिमुकल्यानं गायलं गाणं; शाळकरी मुलांच्या VIDEOने जिंकलं महाराष्ट्राचं मन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com