Delhi Metro
Delhi MetroSaam Tv News

Viral Video: 'माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिसात...' मेट्रोमध्ये सीटवरुन वाद, व्हिडिओ व्हायरल

Delhi Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला सीटवरून वाद घालत आहेत. अशातच एका तरूणीनं माझा प्रियकर दिल्ली पोलिसात असल्याचं सांगत धमकी दिली आहे.
Published on

दिल्ली मेट्रो ही देशातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. दिल्ली मेट्रोमध्ये दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पण गेल्या काही काळापासून दिल्ली मेट्रो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी मेट्रोमध्ये प्रवासी गाणी गाताना दिसत आहे. तर कधी प्रवासी डान्स करताना दिसत आहेत. हे व्हिडिओ पाहून दिल्ली मेट्रो मनोरंजनाचे केंद्र बनले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशातच आणखीन एक दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात सीटवरून दोन महिला आपपसात भांडताना दिसून येत आहे. नंतर एक तरूणी दुसर्‍या महिलेला माझा प्रियकर दिल्ली पोलिसात कार्यरत असल्याचं सांगत धाक दाखवत आहे. मेट्रो दिल्लीचा सीटवरून झालेल्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून भांडण

दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. सध्या मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत महिला कोचमध्ये २ महिलांमध्ये बाचाबाची झालीय. एक महिला सीटवर बसलेली असते. दुसरी महिला तिला, 'मॅडम,माझा बॉयफ्रेण्ड दिल्ली पोलिसात आहे. तो पोलीस उपनिरिक्षक आहे. मी त्याला फोन करू का?' ज्याला उत्तर देत सीटवर बसलेली महिला, 'हो लाव ना त्याला कॉल, तू कुणाला धमकावत आहे.'

Delhi Metro
Viral Video: भर मांडवात नेमके काय घडले? लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

यावर उत्तर देत उभी असलेली मुलगी, 'मी धमकावत नाहीय. खरंच माझा प्रियकर दिल्ली पोलिसात कार्यरत आहे.' यावर सीटवर बसलेली महिला, 'हो मग कॉल कर त्याला, उगाच कशाला मला धमकी देत आहेस.' असं निडर होत तिनं उत्तर दिलं. मेट्रोमध्ये या दोन महिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झालाय. काही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करत व्हिडिओ शेअर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com