Girl Fight Saam Tv
व्हायरल न्यूज

Girl Fight : आधी धक्का मारला, नंतर एकमेकींचे केस ओढले; गजबजलेल्या कॅफेतच दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत मात्र परत एकदा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात दोन तरुणींमध्ये तूफान हातापायी होताना दिसून येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा लग्नातील विविध प्रसंगाचे व्हिडिओ असतात तर कधी अनेक व्यक्तीच्या हाणामारीचे व्हिडिओ असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर नुकताच एक हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काही मुलींमध्ये जोरदार मारामारी होत आहे. या सर्व मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सर्व परिसर एका कॅफेचा वाटत आहे. यात दोन तरुणी तुम्हा सुरुवातीस बोलताना दिसतात. परंतू काही वेळातच एक तरुणी दुसऱ्या तरुणीला रागात धक्का मारते. मग जिला धक्का ती तरुणीही दुसरीला जोरात धक्का मारायला लागते. त्यानंतर दोघींमध्ये मारामारी(Fight) होताना दिसते.

काही वेळात त्यांची मारामारी सोडवण्यासाठी एक तरुणी तिथे येते.मात्र तिला या दोघींना सावरताच आले नाही. या दोघींची हाणामारी प्रचंड रुप घेते.चक्क जमिनीवर पडून दोघी हाणामारी करत आहेत. शिवाय व्हिडिओत (Video )दिसते की, तिथे काही तरुण मुलंही दिसत आहे.

तरुणींच्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया(media) प्लॅटफॉर्मवरील @ GharKeKales या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नोएडामधील असल्याचे समजते.व्हिडिओ व्हायरल होताच लाखोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' तिथे बसलेले तरुण हाणामारीची फक्त मज्जा पाहात आहेत,' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'तरुणींची हाणामारी कधीही पुरुषांच्या हाणामारीपेक्षा भारी असते,'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT