Viral Video : लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहिजे; तरुणाने भरचौकात पोस्टर दाखवत मनातलं सांगितलं, पाहा VIDEO

Viral Video : लग्नासाठी एका तरुणाने वेगळीच शक्कल शोधली आहे. त्याने थेट मी घर जावई होण्यासाठी तयार आहे असं पोस्टर चौकात लावलं आहे. या तरुणाचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

सोशल मीडियावर पुणेरी पाट्या फारच चर्चेत असतात. बोलून आणि ओरडून सांगण्यापेक्षा भर चौकात पोस्टर घेऊन त्यावरून मॅसेज देण्याची सध्या भलतीच क्रेझ सुरू आहे. अनेक तरुण किंवा वृध्द व्यक्ती देखील आपल्या मनातील गोष्टी एका पोस्टरवर लिहून ते पोस्टर घेऊन चौकात उभे राहता. यावर येणाऱ्या रिअँक्शन आपल्या फोनमध्ये कैद करतात. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video: मंत्रालयाच्या शौचालयात धुतल्या कपबश्या, व्हिडिओ पाहून संताप होईल अनावर

घर, करिअर, नोकरी यासह लग्न झालं म्हणजे सेटल झालो असं म्हणतात. आता लग्नासाठी एखाद्या मुलीचा हात मागणे सोप्पे तितके नाही. मुलीच्या तसेच तिच्या कुटुंबियांच्या मुलाकडे अनेक अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करता येत नसल्याने अनेक मुलांची लग्न जुळत नाहीत.

अगदी वयाची तिशी ओलांडलेले देखील अनेक तरुण आहेत ज्यांचे अजूनही लग्न जुळलेलं नाही. त्यामुळे लग्नासाठी एका तरुणाने वेगळीच शक्कल शोधली आहे. त्याने थेट मी घर जावई होण्यासाठी तयार आहे असं पोस्टर चौकात लावलं आहे. या तरुणाचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण हातात पोस्टर घेऊन चौकात उभा आहे. मला लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी पाहिजे. मग मी घर जावई सुद्धा व्हायला तयार असल्याचं त्याने या पोस्टरवर लिहिलं आहे. त्याचे पोस्टरपाहून रस्त्यावरील सर्वच व्यक्ती चकित झालेत. सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.

रस्त्यावर उभे राहून अनेक व्यक्तींनी या तरुणाचा आणि पोस्टरचा विडिओ रेकॉर्ड केला आहे. तरुणाच्या या व्हिडिओवर अनेक अतरंगी कमेंट आल्यात. भारतात आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे. येथे पुरुषांना प्रथम स्थान आणि प्रथम दर्जा दिला जातो. तसेच मुली लग्नानंतर आपलं घर सोडून पतीच्या घरी जातात.

आता हीच पद्धत मोडण्यासाठी या तरुणाने असं केलं असावं. मुली ज्या पद्धतीने घर सांभाळतात तसेच तिला देखील यायला हवे, अशी कमेंट एकाने केली आहे. एकदम बरोबर आहे, हुंडा किती घेणार, अशा अनेक कमेंट्ससह काहींनी या व्हिडिओवर हसण्याचे देखील ईमोजी पाठवले आहेत.

Viral Video
VIDEO: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, लोकसभेत Varsha Gaikwad यांची मोठी मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com