Veg Non Veg Panipuri: काय सांगता! चिकन आणि कोळंबी पाणीपुरी...; मिळतेय तरी कुठे व्हिडीओमध्ये पाहा

Panipuri Viral Video: आता पाणीपुरीत सुद्ध व्हेज आणि नॉनव्हेज; चिकन अन् पनीर फ्लेवरचा व्हिडीओ व्हायरल
Veg Non Veg Panipuri
Veg Non Veg PanipuriSaam TV

Veg Non Veg Panipuri Video:

पाणीपुरी लहान, मोठे अशा सर्वांच्याच आवडीची असते. पाणीपुरी नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अशात तुम्ही कधी नॉनव्हेज आणि व्हेज पाणीपुरी खाल्ली आहे का? (Latest Panipuri News)

Veg Non Veg Panipuri
Ganpati Festival 2023 : इंडोनेशियाच्या ज्वालामुखीत आहे श्रीगणेशाच मंदिर, ७०० वर्षांपासूनची परंपरा कायम

पाणीपुरीमध्ये बटाटा किंवा रगडा टाकला जातो. म्हणजे पाणीपुरी शक्यतो व्हेज आहे असं अनेक जण म्हणतील. मात्र एका व्यावसायिकाने आपलं स्वतःचं व्हेज आणि नॉनव्हेज पाणीपुरीचं दुकान सुरू केलं आहे.

या व्यक्तीने व्हेजमध्ये पनीर आणि विविध भाज्यांची पाणीपुरी ठेवली आहे. तर नॉनव्हेजमध्ये चिकन आणि कोळंबी पाणीपुरी बनवली आहे. अनेक खवय्ये त्यांची ही हटके पाणीपुरी खाण्यासाठी येथे गर्दी करत आहेत.

तामिळनाडूमधील तिरुवनमीयुर आरटीओ बीच, बेसंत नगर बीच येथे ही व्हेज आणि नॉनव्हेज पाणीपुरी मिळते. @exprolingbydani या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हाराल होतोय. काहींना पणीपुरीची ही कन्सेप्ट फार आवडली तर अनेकांनी यावर हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाणीपुरीच्या दुकानावर खवय्यांची नेहमीच झुंबड पाहायला मिळते. मात्र अशी पाणीपुरी पाहून अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. प्रत्येक पदार्थाची एक वेगळी चव असते. ही चव बिघडल्यास तो पदार्थ खावासा वाटत नाही. अशात सोशल मीडियावर सध्या कोणत्याही पदार्थात काहीही टाकून खाल्ले जाते. त्यामुळे खवय्ये संताप व्यक्त करत आहेत.

Veg Non Veg Panipuri
Ganpati Festival 2023 : इंडोनेशियाच्या ज्वालामुखीत आहे श्रीगणेशाच मंदिर, ७०० वर्षांपासूनची परंपरा कायम

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com