Ganpati Festival 2023 : इंडोनेशियाच्या ज्वालामुखीत आहे श्रीगणेशाच मंदिर, ७०० वर्षांपासूनची परंपरा कायम

Ganeshotsav 2023 : माउंट ब्रोमोचे वैशिष्ट म्हणजे या ज्वालामुखीच्या मुखाशी असलेले गणपतीचे मंदिर.
Ganpati Festival
Ganpati FestivalSaam Tv
Published On

Ganesh chaturthi 2023

इंडोनेशिया देश हा ज्वालामुखीमुळे प्रसिद्ध आहे. इंडोनेशियामध्ये एकूण १४१ ज्वालामुखी आहेत. त्यापैकी १३० हे सक्रिय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखीचा सतत उद्रेक होत असतो. त्यातील एक ज्वालामुखी म्हणजे 'माउंट ब्रोमो'. माउंट ब्रोमोचे वैशिष्ट म्हणजे या ज्वालामुखीच्या मुखाशी असलेले गणपतीचे मंदिर.

जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी असल्याने पर्यटकांना तेथे जाण्यास मनाई आहे. परंतु या ज्वालामुखीच्या तोंडाशी बांधलेल्या गणेश मंदिराला पर्यटक भेट देतात. आत मंदिरात जाऊन भाविक पूजा करतात. केवळ गणेश पूजेमुळे हे मंदिर सुरक्षित असल्याचे मानले जाते.

Ganpati Festival
ITR Filling News: कंपन्यांसाठी आनंदाची बातमी! आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवली

माउंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक भाषेत ब्रम्हदेव असा आहे. इथे गणपतीचे मंदिर आहे. स्थानिक लोकांचा विश्वास आहे की, ही मूर्ती ७०० वर्ष जूनी आहे. पूर्वजांनी या मूर्तीची स्थापना केली आहे. मान्यतेनुसार, ही गणेशमूर्ती ज्वालामुखीच्या जवळ असूनही स्वतः चे रक्षण करते. या ज्वालामूखीच्या पूर्वीला राहणारी आदिवासी जमात टेंगरेस म्हणून ओळखली जाते. ही जमात अनेक शतकांपासून गणपतीची पूजा करतात.

हे मंदिर पुरा लुहूर पोटें म्हणून ओळखले जाते. मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथे अनेक गणेश मूर्ती आहेत ज्या गोठलेल्या ज्वालामुखींच्या लाव्हापासून बनवलेल्या आहेत.ब्रोमो पर्वताशेजारी असलेल्या ३० गावांमध्ये या जमातीचे १ लाख लोक राहतात. हे लोक स्वतः ला हिंदू मानतात आणि हिंदू धर्माप्रमाणे पूजा करतात. काही वर्षांनी या चालीरीतींमध्ये बौद्ध प्रथा जोडली गेली आहे.

टेंगरेसमध्ये एका विशेष पुजेला खास महत्त्व आहे. येथील लोक दरवर्षी १४ दिवस ब्रोमो पर्वताच्या मुखाशी असलेल्या गणपतीची पूजा करतात. या पूजेला यज्ञ कसदा उत्सव म्हणतात. १३व्या आणि १४ व्या शतकादरम्यान ही पूजा सुरू झाल्याचे मानले जाते. ही पूजा करण्यामागे एक कथा आहे.

एका राजा राणीला बरीच वर्षे मुल बाळ होत नव्हतं. त्यांना देवाने एका अटीवर १४ मुले दिली. ही अट अशी होती की, तुमचे २५ वे बाळ या पर्वताला अर्पण करावे लागेल. त्यानंतर दरवर्षी ही पूजा आणि पशुबळीची प्रथा सुरू झाली.

आजही येथे बकऱ्यांचा बळी दिला जातो. या यज्ञाशिवाय ज्वालामुखीत फळे, फुले आणि भाज्यादेखील अर्पण केल्या जातात. गणपतीची पुजा केल्याने आणि ज्वालामुखीमध्ये फळे अर्पण केल्याने ज्वालामुखीचा उद्रेक थांबतो किंवा नष्ट होता. असा लोकांचा समज आहे.

Ganpati Festival
Almond Benefits : बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, वजनावर परिणाम होतो परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com