Almond Benefits : बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, वजनावर परिणाम होतो परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Overweight issue : वाढत्या वजनामुळे हृदयाच्या समस्यांदेखील वाढत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Almond Benefits
Almond BenefitsSaam Tv
Published On

Is Almond Good For Health :

बदलेल्या जीवनशैलीमुळे जगभरात वाढत्या वजनाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या वजनामुळे हृदयाच्या समस्यांदेखील वाढत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आपल्या दैनंदिन आहारात आपण ड्रायफ्रुट्सचे सेवन करतो. गोडाच्या पदार्थाला आणखी चविष्ट आणि सुंदर बनवण्यासाठी बदाम फायदेशीर मानले जाते. परंतु, संशोधनात असे आढळून आले आहे की, बदामाचे सेवन केल्याने वजन कमी होते. तर कार्डिओमेटाबॉलिक आरोग्य देखील सुधारते.

Almond Benefits
Ganesh Chaturthi 2023 Mantra : गणेशोत्सवात करा 'वक्रतुंड महाकाय' मंत्राचा जप, आर्थिक संकटांपासून राहाल दूर; जाणून घ्या महत्त्व

याबाबतची माहिती ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जगभरात 1.9 अब्ज लोक जास्त वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक तीनपैकी दोन लोक जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा ड्रायफ्रुट्सला खराब श्रेणीत ठेवले जाते.

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाच्या नुकत्याच झालेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की तुम्ही बदाम खाऊन वजन कमी करू शकता. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधक डॉ. शराया कार्टर यांनी सांगितले की, वजन नियंत्रण आणि कार्डिओमेटाबॉलिक आरोग्य या दोन्हींसाठी बदाम किती प्रभावी आहेत हे या अभ्यासातून दिसून आले आहे.

1. पोषकत्त्वांनी समृद्ध बदाम

बदामामध्ये (Almond) प्रथिने आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात. ते जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील समृद्ध आहेत. बदामामध्ये जास्त प्रमाणात फॅट आढळते ज्यामुळे वजन वाढते असे अनेकांना वाटते. पण यात असणारे घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी सुधारते आणि जळजळ कमी करून हृदय निरोगी ठेवते.

Almond Benefits
Tea Side effects On Digestion: दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिताय? होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

2. बदामाचे इतर फायदे-

  • कोरडी त्वचा (Skin) मऊ करण्यासाठी बदाम खूप फायदेशीर मानले जातात.

  • बदाम मेंदूच्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

  • बदामाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • बदाम डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com