Child Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Child Viral Video: माझी मम्मी मला उठवत नाही.. शाळेत उशिरा येण्याचे चिमुकल्याने दिले मजेशीर उत्तर; VIDEO VIRAL

Child Viral Video: लहान मुले खूप खेळकर असतात. कधी काय बोलतील याचा भरवसा नसतो. एका मुलाने शाळेत उशीरा येण्याचे एकदम मजेशीर कारण सांगितले आहे. त्याचे हे कारण ऐकून शिक्षकांनाही धक्का बसला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लहान मुले खूप जास्त खेळकर असतात. लहान मुले त्यांच्या मर्जीनुसार प्रत्येक गोष्ट करत असतात. लहान मुलांना अनेकदा शाळेत जायचा कंटाळा येतो. शाळेत यायला उशीर झाल्यावर शिक्षक लहान मुलांना त्याचे कारण विचारतात. त्यावेळी हा मुलगा एकदम हटके उत्तर देतो. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लहान मुलांच्या शाळेच्या वेळेनुसार पालकांना आपली कामे, दिनक्रम बदलावा लागतो. त्यासाठी सकाळी लवकर उठून त्यांचा डबा बनवावा लागतो. त्यामुळे कधीकधी लहान मुलांचे आवरायला उशीर होतो. त्यामुळे मुलांना शाळेत पोहचायला उशीर होतो. असंच काहीसं कारण एका लहान मुलाने त्याच्या शिक्षकांना दिलं आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक लहान मुलगा शाळेच्या गणवेशात दिसत आहे. तो शाळेत उशीरा आल्यामुळे शिक्षक त्याला कारण विचारताना दिसत आहेत. शिक्षक त्याला विचारतात, 'तू आज उशीरा कसा आलास?', त्यावर तो मुलगा म्हणतो, 'माझी मम्मी स्वतः उठते पण आम्हाला उठवत नाही'. यानंतर या चिमुकल्याचा चेहरा खूप जास्त रडवेला होतो. शिक्षक त्याला म्हणतात, शाळेची वेळ तर ७.३० ची आहे.पण तू ८.३० ला आला आहेस. त्यावर मुलगा म्हणतो, मला नाही माहित. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

bachho_ki_badi_mam या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हे अकाउंट अहमदाबादमधील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेचे आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लहान मुलांचा निरागसपणा, लहान मुले कधी काय बोलतील याचा भरवसा नाही, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अनोखे आंदोलन

Uddhav Thackeray : नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कुणासाठी? उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक, VIDEO

उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार; राऊत यांच्या भविष्यवाणीवर रामदास कदमांचा पलटवार | VIDEO

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT