Arvind Kejriwal Six Guarantee: प्रत्येक गावात २४ तास मोफत वीज, शाळा-क्लिनिक; अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या तुरुंगातून दिल्या ६ गॅरंटी

Sunita Kejriwal : सुनिता केजरीवाल यांनी रामलीला मैदानावरील सभेत बोलताना देशातील नागरिकांना ६ गरंटी दिल्यात. शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांच्या फायद्याच्या सहा गॅरंटी काय आहेत ते जाणून घेऊ.
Arvind Kejriwal Six Guarantee
Arvind Kejriwal Six GuaranteeSaam Tv

Arvind Kejriwal Six Guarantee:

दिल्लीच्या रामलीली मैदानात आज इंडिया आघाडीची आज रॅली झाली. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी ईडीच्या तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना ६ गॅरंटी दिल्यात. जर इंडिया आघाडी सरकारची सत्ता आली तर या सहा गॅरंटीची पूर्तता केली जाईल. (Latest News)

कोणत्या आहेत गॅरंटी

ईडीच्या तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांची पहिली गॅरंटीने पूर्ण देशातील नागरिकांना २४ तास वीज मिळेल. वारंवार वीज जाण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

अरविंद केजरीवाल यांची दुसरी गॅरंटी देशातील प्रत्येक गरिक व्यक्तीला मोफत वीज दिली जाईल.

अरविंद केजरीवाल यांची तिसरी गॅरंटी देशातील प्रत्येक गावात आणि परिसरात उत्कृष्ट सरकारी शाळा बांधल्या जातील. गरीबी आणि श्रीमंती यात फरक राहणार नाही.

प्रत्येक गावात आणि प्रत्येक चौकात मोहल्ला क्लिनिक तयार केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशअलिस्ट रुग्णालये तयार केले जातील.

शेतकऱ्यांसाठी अरविंद केजरीवाल यांनी गॅरंटी दिलीय. स्वामीनाथन आयोगानुसार, सर्व पिकांसाठी योग्य एमएसपी दिलं जाईल.

दिल्लीतील जनतेला त्यांचा हक्क मिळवून देऊ. दिल्लीच्या जनतेला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल अशी गॅरंटी दिली जाईल.

Arvind Kejriwal Six Guarantee
PM Modi vs Rahul Gandhi : 'देश सरकार नव्हे तर गुन्हेगारी टोळी चालवत आहे', राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com