PM Modi vs Rahul Gandhi : 'देश सरकार नव्हे तर गुन्हेगारी टोळी चालवत आहे', राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Political News : अरविंद केजरीवाल यांची अटक, निवडणूक रोखे, काँग्रेसचं बँक अकाऊंट गोठवणे अशा विविध विषयांवरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
PM Narendra Modi on Rahul Gandhi
PM Narendra Modi on Rahul Gandhi Saam TV
Published On

Political News :

INDIA आघाडील पक्षांची आज दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली होणार आहे.  अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधीपक्ष पुन्हा एकदा एकवटला आहे. मोदी सरकारविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर सेव्ह डेमोक्रेसी रॅलीचं आयोजन करण्यात इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे. त्याआधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल यांची अटक, निवडणूक रोखे, काँग्रेसचं बँक अकाऊंट गोठवणे अशा विविध विषयांवरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. भाजप देशात वसुली सरकार चालवत आहेत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi on Rahul Gandhi
INDIA आघाडीच्या वतीने आज रामलीला मैदानावर 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली'चं आयोजन, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक नेते राहणार उपस्थित

राहुल गांधींनी काय म्हटलं?

राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींना लोकशाहीचा गळा दाबून नागरिकांकडून त्यांच्या आवडीचे सरकार निवडण्याचा अधिकार काढून घ्यायचा आहे.

एकीकडे 'चंदे का धंदा' करणारे भाजप देशात 'वसुली सरकार' चालवत आहे. तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवून, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून आणि प्रत्येक स्वतंत्र आवाज दाबून, ते विरोधी पक्षांना न्याय्य पद्धतीने निवडणूक देखील लढवू देत नाहीय.

PM Narendra Modi on Rahul Gandhi
Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगे यांची घोषणा

जो भाजपसोबत नाही त्याला तुरुंगात टाका

जो कोणी भाजपाला देणगी देतो - त्याला जामीन द्या

प्रमुख विरोधी पक्षासोबत - नोटीसांचा खेळ

निवडणूक रोख्यांसाठी - ब्लॅकमेल

असं वाटतंय की देश सरकार नव्हे तर गुन्हेगारी टोळी चालवत आहे. ही लढाई भाजप आणि जनतेच्या हक्काची आहे. त्यात आम्ही जनतेच्या पाठीशी उभे आहोत. लोकशाहीच्या विजयातच INDIA चा विजय आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com