Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: क्षुल्लक कारणावरुन तरुणांकडून कंडक्टरला बेदम मारहाण; घटनेचा व्हिडीओ आला समोर

Fighting Viral Video: बसमधील एका प्रवाशाला त्याच्या सांगितलेल्या स्थानकावर न सोडल्यामुळे काही व्यक्तींनी बसमध्ये चढून बस कंडक्टरवर प्राणघातक हल्ला केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tamil Nadu Viral Video

तमिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली. बसमधील एका प्रवाशाला त्याच्या सांगितलेल्या स्थानकावर न सोडल्यामुळे काही व्यक्तींनी बसमध्ये चढून बस कंडक्टरवर प्राणघातक हल्ला केला. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या बाबतची अधिक चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडमधील त्रिची जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यात एका खाजगी बस प्रवाशांनी घेऊन चाथीराम ते थुवाकुडी असा प्रवास करत होती, त्यादरम्यान बसलेल्या महिला प्रवाशाला वरागनेरी चुलईकराय मरियम्मन मंदिराच्या ठिकाणी उतरायचे होते. मात्र कंडक्टरने सांगितलेल्या ठिकाणी बस न थांबता पुढेच्या स्टॉपवर तिला उतरवल्यानंतर महिला प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

काही वेळानंतर चाथीराम बस स्थानकावर परत आल्यावर बसमध्ये काहीजण चढले आणि कंडक्टरला मारहाण करु लागले तसेच त्याने महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला. हल्लेखोरांनी कंडक्टरला मारहाण केल्यानंतर त्याची पैसे असलेली बॅग हिसकावण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान बसमधील महिला प्रवाशांनी कंडक्टरला वाचवले आणि कंडक्टरने त्यानंतर जवळील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आपल्याला दिसते. त्यामध्ये बसमधील कंडक्टरही गर्दीत उभा आहे. काही वेळानंतर बसमध्ये काही व्यक्ती चढतात आणि क्षणाचाही विलंब न करता बस कंडक्टरला जोर जोरात मारु लागतात. बसमधील असलेल्या प्रवाशांनी कंडक्टरची मदत करुन त्याला त्या व्यक्तींच्या तावडीतून सोडवतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @HateDetectors या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळत असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

SCROLL FOR NEXT