Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नाच रे मोरा आंब्याच्या वनात गाण्यावर बालमित्र थिरकले; शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केला डान्स; पहा VIDEO

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका शाळेच्या स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काही पुरुषांनी धम्माकेदार डान्स केला मात्र हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या पंसतीस आलेला आहे.

Tanvi Pol

Viral Video: प्रत्येकासाठी शाळेच्या आठवणी अतिशय महत्त्वाच्या आणि खुप अनमोल असतात. मग अनेकदा सोशल मीडियावर शाळेच्या गेट-टु- गेदरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन आयोजित केलेले आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओत स्नेहसंमेलनानिमित्ताने अनेक जुने विद्यार्थी जमलेले आहेत. संपूर्ण परिसर एका रिसॉर्टचा आहे. जिथे या स्नेहसंमेलनानिमित्ताने शाळेतील जे जुने विद्यार्थी होते ते वयाच्या साधारण ३०-४१ आता जमलेले आहेत, अशातच व्हिडिओत पाहिले तर काही पुरुष नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाच या गाण्यावर डान्स(Dance) करत आहेत. यांचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण अतिशय खुष दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''anand_resort__panhala'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''आयुष्यात आपण कितीही मोठे झालो कितीही वयस्कर झालो तरीही आपल्या बालमित्रांसाठी आपण लहानच असतो आणि लहानपणामध्ये जो निर्मळ आनंद आपण जगत असतो तो आयुष्यभरासाठी विस्मरणीय असतो'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंच्या घरात लाईक्स आणि व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खुप सुंदर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''क्या बात अतिशय मस्त'', अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT