Bus Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bus Viral Video: हा तर वेड्यांचा बाजार! धावत्या बसमध्ये बांधला झोपाळा अन् घेतोय आनंद; कंडक्टर संतापला; VIDEO VIRAL

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका बसचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका बसमध्ये प्रवाशाने चक्क झोपाळा बांधला आहे. झोपाळ्यात बसून तो आनंद घेताना दिसत आहे. याता व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स, कधी गाण्याचे व्हिडिओ असतात. याचसोबत कधकधी हाणामारीचे आणि जुगाडचे व्हिडिओ पाहायला मिळतात. प्रसिद्धीसाठी कोणता व्यक्ती काय करेल याचा भरोसा नाही. एका व्यक्तीने चक्क बसमध्ये झोपाळा बांधला आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका बसमध्ये झोपाळा बांधलेला दिसत आहे. या झोपाळ्यात एका व्यक्ती बसून झोपाळ्याचा आनंद घेत आहे. हा व्यक्ती जवळपास ४० वर्षांचा असेल. व्हिडिओतील व्यक्तीने लहान मुलांसारखी डोक्याला टोपी बांधली आहे. त्याने निळ्या रंगाचा झोपाळा बांधला आहे. या बसमध्ये इतर अनेक लोक बसलेले दिसत आहे. या व्यक्तीने बसमध्येच झोपाळा बांधल्याने कंडक्टरने त्याला तो झोपाळा काढून टाकण्यास सांगितले. परंतु तो व्यक्ती काही झोपाळ्यातून उतरत नाही. तो कंडक्टरशीच भांडण करतो. परंतु शेवटी बऱ्याच वेळानंतर हा व्यक्ती झोपाळ्यातून खाली उतरतो. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

@joshyBeSloshy या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता बसमध्ये फक्त हेच पाहायचे बाकी होते, बाळ नाही तर आता तरुणासाठी झोपाळा बांधण्याचे दिवस आहेत, हा व्हिडिओ खूपच कॉमेडी आहे, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

SCROLL FOR NEXT