Bike Stunt Video : बाईक स्टंटच्या नादात भीषण अपघात; गर्लफ्रेंडसोबत तरुण धाडकन खाली आदळला, पाहा VIDEO

Bike Stunt Accident Video Viral : दोघांनी डोक्यात हेल्मेट घातल्यने त्यांचा जीव वाचला असावा असं व्हिडिओ पाहून वाटत आहे. तरुणाच्या स्टंटबाजीमुळे तरुणीच्या मात्र चांगलच जीवावर बेतलं आहे.
Bike Stunt Video
Bike Stunt VideoSaam TV

वाहन चालवताना वेगमर्यादेचं पालन करणे गरजेचं असतं. मात्र अनेक व्यक्ती वेग मर्यादा न पाळता दुचाकी आणि चारचाकी चालवतात. अशी माणसं स्वत:सह दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात घालतात. तरुणांमध्ये अशापद्धतीने स्टंट करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशात एका तरुणाचा आणि तरुणीच्या अपघाताचा एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

Bike Stunt Video
Borghat Waterfall : ऐन उन्हाळ्यात धबधबे झाले प्रवाहित; मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना वेगळा अनुभव, पाहा Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत दुचाकीवरून प्रवास करत आहे. प्रवास करताना या दोघांनाही दुचाकीवर स्टंट करण्याची बुद्धी सुचते. आपल्या प्रेयसीला आणखी इंप्रेस करण्यासाठी की काय तरुण दुचाकी मागच्या चाकावर उचलून घेतो. मागच्या चाकावर संपूर्ण बाईकचा भार येतो. हा स्टंट करताना पुढे काय होणार, आपल्याला मोठी दुखापत होईल का? याची काहीच कल्पना या दोघांच्या मनात नसते.

मात्र तितक्यात तोल जातो. दुचाकीचा भार एकाच चाकावर आल्याने दुचाकी हलू लागते. तरुणाला ती बॅलेन्स करता येत नाही. त्यामुळे दुचाकी मागच्या मागे उलटी होऊन रस्त्याला आपटत पुढे जाते. त्यामुळे सुरुवातीला तरूणी जोरदार खाली आदळते. खाली पडताच तिचे दोन्ही पाय मागे दुमडले जातात आणि ती तोंडावर आदळते. त्यानंतर तिचा प्रियकर देखील खाली आदळताना दिसतो आहे.

अपघात होतो तेव्हा त्यांच्या दुचाकी शेजारी अन्य काही वाहने देखील जात असतात. या दोघांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने त्यांचा जीव वाचला असावा असं व्हिडिओ पाहून वाटत आहे. तरुणाच्या स्टंटबाजीमुळे तरुणीच्या मात्र चांगलच जीवावर बेतलं आहे. व्हिडिओ पाहता असं वाटत आहे की यामध्ये तरुणीचे पाय फ्रॅक्चर झाले असावे.

सोशल मीडियावर @tumoto.vzla या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सदर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंटकरत दोघांची काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी दोघांच्या अपघाताच्या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी वेगात थेट पुढे उडून गेली. रस्त्यावरील अन्य व्यक्ती बेसावध असत्या तर आणखी जास्त भीषण अपघात घडला असता. तरुणांनी केलेली मस्ती दोघांनाही चांगलीच भोवली आहे. आता आयुष्यात दोघेही कधीच असा स्टंट करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिली आहे.

Bike Stunt Video
Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com