डोनाल्ड ट्रम्प आणि बेन्यामिन नेत्यान्याहूंनी इराणवर हल्ला करुन आखाती देशांना युद्धाच्या खाईत लोटलंय... मात्र हे युद्ध जेलमध्ये जाण्याच्या भीतीनेच जगावर लादल्याची चर्चा आहे....कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित जेफ्री एपिस्टीनच्या डुप्लिकेट म्हणून दाबल्या गेलेल्या 15 फाईल सार्वजनिक केल्या गेल्या आहेत... आणि त्यामुळे जगात खळबळ उडालीय... या फाईल्स समोर आल्यानंतर महिलांनी काय आरोप केलेत? पाहूयात....
1980 च्या दशकात न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये जेफ्री एपिस्टीनने ट्रम्प यांच्याशी 13 ते 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची ओळख करुन दिली... त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.. त्याला विरोध केला असता ट्रम्प यांनी मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केलाय... या महिलेनं 2019 मध्ये फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला जबाब दिला होता..
एका बाजूला एपिस्टीन फाईलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध असल्याचा आरोप होत असतानाच त्यांनी इराणविरोधात युद्ध छेडलं... नेमका हाच धागा पकडून इराणविरोधात युद्ध छेडलं तरी एपिस्टीन फाईल दबल्या जाणार नाही, असा इशाराच अमेरिकेच्या काँग्रेसचे खासदार थॉमस मेस्सी यांनी दिलाय... तर ट्रम्प सरकारच्या कायदा मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावलाय... हे असं असलं तरी फक्त ट्रम्प यांनीच नाही तर युद्धखोर असलेले इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेन्यामिन नेत्यान्याहूसुद्धा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यामुळेच युद्ध छेडल्याचा आरोप होतोय... मात्र हे आरोप काय आहेत? पाहूयात....
व्यावसायिकांना सरकारी आणि राजकीय मदत देण्यासाठी सिगार, शॅम्पेन, लग्झरी ज्वेलरीचं गिफ्ट मिळवल्याचा आरोप आहे... सकारात्मक मीडिया कव्हरेजसाठी प्रतिस्पर्धी मीडियावर निर्बंध घातल्याचा आरोप करण्यात आलाय.. आता याच आरोपात बेंझामिन नेत्यान्याहूंना जेल होण्याची शक्यता आहे... त्यामुळे इराणचा बागुलबुवा दाखवून नेत्यान्याहूंनी अमेरिकेच्या मदतीनं युद्ध छेडलंय... मात्र आता दोन्ही मित्र एकाच वेळी संकटात सापडण्याची शक्यता असल्यानं ट्रम्प यांनी इस्त्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांना विनंती करुन नेत्यान्याहूंना माफी देण्याची मागणी केलीय... त्यामुळे इराणविरोधातील युद्ध संपल्यानंतर इपिस्टीन फाईल प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प आणि भ्रष्टाचार प्रकरणी ट्रम्प यांचे मित्र बेन्झामिन नेत्यान्याहूंना जेलवारी होणार की जेलवारी टाळण्यासाठी ट्रम्प आणि नेत्यान्याहू जोडगोळी युद्ध लांबवत नेणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.