Rajasthan Accident: चालकाला लागली डुलकी अन् बस धावत्या ट्रकला धडकली; ७ जणांचा मृत्यू, ८जण जखमी

Rajasthan Bus and Truck Accident : भरतपूरमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले होते. या जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी आणखी तीन जखमींना मृत घोषित केलं.
Rajasthan Accident: चालकाला लागली डुलकी अन् बस धावत्या ट्रकला धडकली;  ७ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी
Rajasthan Bus and Truck AccidentSaam Tv

राजस्थानमधील भरतपूरमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. तर ८ जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झालाय. भरतपूरमधील आग्रा- जयपूर महामार्गावर युपी रोडवेजची बस आणि ट्रकचा अपघात झाला. याप्रकरणी डीएसपी धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले की, हलैना बसस्थानकाजवळ यूपी राज्यातील क्रमांकाच्या बस पुढे धावणाऱ्या ट्रकला धडकली.

या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले होते. या जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी आणखी तीन जखमींना मृत घोषित केलं. सध्या ८ जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये नव्याने तीन जणांचा समावेश झाल्याने मृतांचा आकडा ७ वर पोहोचलाय. यात ४ महिलांचा समावेश आहे.

बस चालकांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती डीएसपी धर्मेंद्र कुमार यांनी दिली. दरम्यान अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेलाय. एकतर बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता किंवा तो झोपी गेला असावा, त्यामुळे हा अपघात झाल्याचं धर्मेंद्र कुमार म्हणाले. अपघातानंतर बस क्रेनच्या सहाय्याने महामार्गावरून हटवण्यात आलीय.

Rajasthan Accident: चालकाला लागली डुलकी अन् बस धावत्या ट्रकला धडकली;  ७ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी
Bus Accident: ओव्हरटेक करताना भीषण अपघात; खासगी बस कंटेनरला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com