Local Train Video Saam tv
व्हायरल न्यूज

Local Train Video : लोकलने असा जीवघेणा प्रवास करू नका; मनाला चटका लावणारा व्हिडिओ पाहाच

Local Train viral Video : मुंबईतील लोकल ट्रेन लटकणाऱ्या प्रवाशांचा जीवघेणा प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनाला चटका लावणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसतात. मुंबईतील लोकल ट्रेनमुळे दिवसाला १० जणांचा अपघाती मृत्यू होतो, असा दावा केला जातो. याचदरम्यान, सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडतो. प्रवासी ट्रेनमधून पडताच इतर प्रवासी जोराने ओरडू लागतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ मुंबई सेंट्रलचा असल्याचं बोलण्यात येत आहे. मुंबई लोकल ट्रेनच्या बाजूने एक एक्स्प्रेस जात होती. या एक्स्प्रेसमधील प्रवासी मोबाईलने लोकल ट्रेनने लटकणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ काढत होते. यावेळी चार तरुण लोकलला ट्रेनला लटकून प्रवास करत होते. त्याचवेळी एका तरुणाचा हात निसटतो. त्यानंतर तो ट्रॅकवर पडतो.

लोकल ट्रेनने लटकताना तरुणाचा हात खांबाला धडकतो. त्यानंतर हा तरुण धावत्या ट्रेनमधून पडतो. त्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या बाजूचे प्रवासी जोराने ओरडतात. ही घटना संपूर्ण कॅमऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतील तरुण प्रवासीचं पुढे काय झालं, याची माहिती कळू शकलेली नाही.

लोकल ट्रेनने लटकताना तरुणाचा हात खांबाला धडकतो. त्यानंतर हा तरुण धावत्या ट्रेनमधून पडतो. त्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या बाजूचे प्रवासी जोराने ओरडतात. ही घटना संपूर्ण कॅमऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतील तरुण प्रवासीचं पुढे काय झालं, याची माहिती कळू शकलेली नाही.

दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पश्चिम रेल्वे असो मध्य रेल्वे या मार्गावर दररोज गर्दी पाहायला मिळते. कर्जत-बदलापूरहून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात.

लोकलच्या गर्दीतून प्रवास करताना अनेक प्रवाशांना जीव गमावण्याचीही वेळ आली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनला लटकून किंवा दरवाज्यात उभे राहून प्रवास करू नका, असं रेल्वेकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, लोकलच्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करावा लागतो. लोकल ट्रेनने प्रवास करताना घरी आपलं वाट पाहणारं असतं, यामुळे जीव सांभाळून प्रवास करायला हवां, असे प्रवासी एकमेकांना सल्ले देत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT