Local Train Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Local Train Viral Video: ठाणे-वाशी लोकलमध्ये तरूणाचं अश्लील कृत्य, महिलेला समजताच थोबाड फोडलं

Local Train Viral Video: ठाणे ते वाशी लोकलमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना सध्या व्हायरल झाली आहे. तरूणीने अश्लील कृत्य करणाऱ्याला चांगलाच चोप दिला.

Manasvi Choudhary

महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. घर असो किंवा प्रवासाच्या ठिकाणी महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागते आहे. अनेकदा अश्या घटना समोर येतात. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. नुकतच रेल्वेमध्ये हा संतप्त प्रकार घडला आहे. जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.

रेल्वेमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजूबाजूंच्या परिस्थितीचे भान न ठेवता हे लोक नको ते कृत्य करतात. सध्या अशीच एक घटना ठाणे ते वाशी रेल्वे लोकलमध्ये घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ठाणे ते वाशीदरम्यानच्या लोकलमध्ये एक व्यक्ती हस्तमैथुन करताना पकडला गेला आहे. तरूणीच्या बाजूला बसून हा व्यक्ती अश्लील कृत्य करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे जेव्हा त्या तरूणीला समजते तेव्हा ती तरूणी जागा बदलते आणि त्याला चांगलाच चोप देताना दिसते आहे.

ती तरूणी प्रचंड चिडते त्याच्यावर ओरडताना दिसते आहे. रागाच्या भरात शिवीगाळ करत आहे. नंतर प्रवाशांच्या तावडीतून वाचण्यासाठी या तरूणाने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आहे. व्हिडीओमध्ये हा तरूण रेल्वेप्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर खाली पडताना दिसतो आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओवरून सार्वजनिक ठिकाणी देखील महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT