Viral Video News Saamtv
व्हायरल न्यूज

Fight In Train Viral Video: लोकलमध्ये सुरू झालं महायुद्ध! चप्पल अन् बुक्क्यांची तुफान बरसात; व्हिडिओ व्हायरल

Kolkata Train Viral Video: व्हिडिओ पाहून या ट्रेनपेक्षा मुंबईची लोकल परवडली बाबा.. अशाही मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत..

Gangappa Pujari

Viral Video News: सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. जगाच्या कोपऱ्यात झालेली कोणतीही घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते.

अनेकदा हे व्हायरल व्हिडिओ असे काही भयानक असतात की पाहणाराही चक्रावून जातो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रेनमध्ये महिलांची तुफान मारामारी झाल्याचे दिसत आहे. (Viral Video News In Marathi)

सोशल मीडियावर (Social Media) लोकल ट्रेनमधील अनेक व्हायरल व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ समोर आले होते, ज्याची चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या कोलकाताच्या लोकलमधील असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हायरल (Viral Video) व्हिडिओमध्ये महिलांच्या डब्यातील मारामारी दिसत असून थेट हातात चप्पल घेवून एकमेकींवर तुटून पडल्या आहेत. नेहमी मुंबई लोकलमधील भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण आता कोलकत्तामधील महिलांच्या रुद्रावताराने मुंबई लोकल बरी अशाच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत..

काय आहे व्हिडिओ...

या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांनी गच्च भरलेला ट्रेनचा डबा दिसत आहे. ज्यामध्ये एक महिला बुक्के आणि चप्पल वापरूनदुसऱ्या महिलेला मारताना दिसत आहे. इतर महिला यामध्ये घाबरतच हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोघीही थांबायचे नाव घेत नसून एकमेकींची केस पकडून त्या मारामारी करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशी भांडणे कधीच पाहिली नसल्याचे सांगितले आहे. तर काही जणांनी या ट्रेनमध्ये महायुद्ध सुरू आहे.. अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओमध्ये या ट्रेनपेक्षा मुंबईची लोकल परवडली बाबा.. अशी तुलनाही केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT