Shirdi Crime News : मध्य प्रदेशातील एका तरुणाने अहमदनगर जिल्ह्यातील २० वर्षीय तरूणीशी इंस्टाग्रामवरून ओळख करून तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून पीडित तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले.
या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून त्याने तिला सतत ब्लँकमेल केले. एवढंच नाही तर तिला इंदूर येथे बोलावून धर्मांतर करून घेतले आणि नमाज पठण करायला लावले. यानंतर त्याने तिच्यावर निकाहासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात इंदूरच्या मौलवीसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, मुळचा मध्यप्रदेशातील इंदूर येथे राहाणारा सायम याने ३ वर्षापूर्वी कोपरगाव येथील २० वर्षीय तरूणीशी इंस्टाग्रामवरून संपर्क केला. त्यानंतर त्याने सतत संपर्क करून तिच्याशी मैत्री केली. यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले.
सुरुवातीला मैत्री केलेल्या सायम याने नंतर तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान २१ मे २०२३ रोजी तो कोपरगाव येथे आला आणि तरुणीला भेटायला बोलवलं. ती भेटायला आली तेव्हा त्याने येथे काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिच्याच मोटारसायकलवर बसून तिला खडकी येथील मदरशात नेले. तिथे त्याने तरुणीवर अत्याचार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. (Tajya Marathi Batmya)
या व्हिडिओ आणि फोटोंवरून सायम तिला ब्लँकमेल करत होता. जाकीर नाईकचे अनेक व्हिडिओ त्याने तिला पाठवले आणि तिच्यावर निकाह करण्यासाठी जबरदस्ती केली. त्याने तरुणीवर दबाव टाकत तिला इंदोरला बोलावून घेतले आणि एका मौलवीकडून तिला नमाज पठण करून धर्मांतर करून घेतले. तसेच निकाहसाठी तिच्यावर जबरदस्ती केली अशी तक्रार पीडित तरुणीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. (Latest Political News)
या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी मुख्य आरोपी सायम याच्यासह त्याचे कोपरगाव येथील दोन साथीदार अशा तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच मौलवी आणि आणखी एक जण अशा दोन आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 376, 363, 354, 328, 295, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.