Mecca City Heavey Rain Fall Saamtv
व्हायरल न्यूज

Mecca Rain Video: सौदीत पावसाचं रौद्ररूप, वादळाचा तडाखा एकाचवेळी; रस्त्यावर चालणारे लोक हवेत उडू लागले, थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mecca City Heavey Rain Fall: सौदी अरेबियातील मक्का शहरातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Saudi Arabia Rain Video: सध्या देशात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत असून मोठ्या दुर्घटनाही समोर येत आहेत. सौदी अरेबियामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियातील मक्का शहरातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पावसाच्या वेगापुढे लोक चालता चालता कोसळताना दिसत आहेत. (Saudi Arabia Rain Video)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौदी अरेबियातील मक्का शहरात पावसाने हाहाकार माजवला आहे. ज्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. सौदी अरेबियामधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सौदीमधील मक्का शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकटांसह झालेल्या या पावसाने अनेक भागात मोठे नुकसान केले.

मक्का (Macca) शहरातील मशिदीत आलेल्या पर्यटकांचे या पावसाने अतोनात हाल झाले. पावसाच्या रौद्ररुपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पावसाचा आणि वाऱ्याचा वेग इतका आहे की लोक चालता चालता घसरताना, पडताना दिसत आहेत. पावसाच्या या रुद्रावताराने लोक चांगलेच घाबरुन गेले असू न एकमेकांना मदत करत लोक रस्त्यावर चालताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसाचा वेग इतका भयंकर आहे की लोक रस्त्यावर चालता चालता घसरताना दिसत आहेत. रस्त्यावरील वस्तू, वाहने अक्षरशः पालापाचोळ्यासारखी उडून जात आहेत. निसर्गाच्या प्रलयाचा हा व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT