Girl Fell Into Valley Video Goes Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: झाडाच्या फांदीला लटकण्याच्या नादात दरीत पडली तरुणी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Girl Fell Into Valley Video Goes Viral: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी दरीच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदीला लटकण्याचा प्रयत्न करते पण तिचा तोल जातो आणि ती दरीत पडते. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Priya More

सोशल मीडिया (Social Media) हे असे प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी एखादा फोटो अथवा व्हिडीओ अवघ्या काही क्षणात व्हायरल होतो आणि चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर व्हिडीओ देखील व्हायरल होतात. ज्याला नेटकऱ्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. या मजेशीर व्हिडीओला खूप चांगले व्ह्यूज देखील मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून देखील हसताना दिसत आहेत. एक तरूणी दरीच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदीला लटकण्याचा प्रयत्न करते पण तिचा तोल जातो आणि ती दरीत पडते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काळ्या रंगाची जिन्स आणि टॉप घातलेली एक तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत डोंगरावर फिरण्यासाठी गेली आहे. यावेळी ही तरुणी एका झाडाच्या फांदीला पकडते आणि त्याला लटकण्याचा प्रयत्न करते. ही तरुणी आपल्या दोन्ही हाताने झाडाची फांदी पकडते. त्यानंतर तरुणीची मैत्रीण तिला ढकलून देते. तेवढ्यात तरूणी पुढे जाते पण तिचा फांदीवरचा हात सुटतो आणि ती थेट दरीत पडते.

घनदाट झाडी असलेल्या या दरीमध्ये तरुणी पडते आणि ती दिसेनाशी होते. तरूणी पडल्याचे पाहून तिच्या मैत्रीणी हसताना दिसतात. तसं पाहयाला गेलं तरी ही घटना खूपच धक्कदायक आहे. व्हिडीओमध्ये फक्त तरुणी पडल्याचे दिसत आहे. पुढे नेमकं काय झाले हे माहिती नाही. ही तरुणी सुखरुप आहे की नाही हे समजू शकले नाही. पण जर तुम्ही सुद्धा अशाठिकाणी फिरायला जात असाल तर अशापद्धतीने स्टंट करू नका. नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते.

हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर parbati.dhami नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर यूजर्सनी कमेंट्स करत लिहिले आहे की, 'ती कुठे गेली आहे?', 'पापा की परी उडाली.', 'ती काहीही करू शकते.', 'पापाची परी उडण्यामध्ये यशस्वी.' या व्हिडिओला दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि व्ह्यूजही मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT