Viral Video Fact Check News SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video : 75 वर्षांचा म्हातारा होईल 25 वर्षांचा तरूण? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

या दाव्यासंदर्भातील सर्व बाबींची खोलवर पडताळणी केल्यानंतर आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Fact Check News : आपण तरूण दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. अशांसाठीच एक अतिशय महत्वाची बातमी. तुम्ही आयुष्यभर तरूण राहावं म्हणून इस्रायलच्या संशोधकांनी संशोधन करून एक थेरपी विकसित केल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियात याची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंच अशा प्रकारे एखादा माणूस चिरतरूण राहू शकतो का? तुम्ही कधीच म्हातारे होऊ शकत नाहीत का? काय आहे यामागचं सत्य,

आपण सुंदर दिसावं, तरूण राहावं यासाठी महिला, पुरूष दोघेही काहीना काही तरी करतच असतात. मग फिटनेससाठी कुणी जिमला जातं, कुणी पार्लरमध्ये जातं तर कुणी जडीबुटी खातं. पण आता या सर्वांवर एकच रामबाण उपाय आल्याची चर्चा सोशल मीडियात रंगलीय. माणूस कायम तरूण राहू शकतो. तो कधीच म्हातारा होऊ शकत नाही, इस्रायालच्या संशोधकांनी एक अशी थेरपी विकसीत केलीय ज्यामुळे 75 वर्षांचा म्हातारा माणूसही 25 वर्षांच्या तरूणासारखा राहिल. असा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय, पाहा..

व्हायरल मेसेज

इस्रायलची तेल अविव युनिव्हर्सिटी आणि शमीर मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी माणसाला चिरतरूण बनवणारं तंत्रज्ञान शोधून काढलंय. त्यासाठी 64 वर्षांवरील 35 वयोवृद्धांवर एक प्रयोग करण्यात आला. या वयोवृद्धांना कोणतेही गंभीर आजार नव्हते. त्यांना आठवड्यातून 5 दिवस विशिष्ट चेंबरमध्ये ठेऊन 90 मिनिटं शुद्ध ऑक्सिजन देण्यात आलं. 3 महिन्यानंतर या वयोवृद्धांमध्ये कमालीचे बदल पाहायला मिळाले. वयोवृद्ध तरूण झाले. वयोवृद्धांचं शरीर 25 वर्षांच्या तरूणांसारखं झालं.

इस्रायलमधील संशोधकांच्या दाव्यामुळे चिरतरूण राहण्याच्या सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र खरंच माणूस कायम तरूण राहू शकतो का? अशी कोणतीही थेरपी उपयोगी ठरू शकते का? याची आम्ही पडताळणी केली. गुगलवर सर्च करत असताना आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या रिसर्चची दखल घेतल्याचं दिसून आलं. अल जजिरा, टाईम्स ऑफ इस्रायल, जेरूसलेम पोस्ट अशा आतंरराष्ट्रीय माध्यमांमध्येही ही बातमी प्रसिद्ध झालीय. इतकच नाही तर काही माध्यमांनी थेट रिसर्च सेंटरला भेट देऊन या थेरपीबद्दल माहिती घेतल्याचं दिसून आलं

आम्ही आमच्या रिसरच सेंटरमध्ये काही वयोवृद्धांवर रिव्हर्स एजिंगचा प्रयोग केला. त्यांना जी ऑक्सिजन थेरपी देण्यात आली त्याचे सकारात्क परिणाम दिसून आले आहे. वयोवृद्ध लोकांमध्ये तरूणांसारखा बदल दिसू लागलाय. त्यामुळे लोक आता या थेरपीसाठी आमच्याकडे विचारणा करतायेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची पडताळणी केल्यानंतर आम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधला.

या दाव्यासंदर्भातील सर्व बाबींची खोलवर पडताळणी केल्यानंतर आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात..

इस्रायलमध्ये वयोवृद्धांना तरूण बनवण्यासाठी संशोधन सुरू आहे. रिव्हर्स एजिंग असं या थेरपीचं नाव आहे. या थेरपीसाठी हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर बनवण्यात आले आहेत. या चेंबरमध्ये वयोवृद्धांना आठवड्यातून 5 दिवस 90 मिनिटं शुद्ध ऑक्सिजन देण्यात आलं. त्याचा परिणाम क्रोमोजोमवर झाला, क्रोमोजोम हे शरीरातल्या DNA पासून तयार झालेलं असतं. जसजसं वय वाढतं तसा क्रोमोजोमवर परिणाम होतो आणि जुन्या पेशी निष्क्रिय होतात. मात्र आमच्या थेरपीमुळे निष्क्रिय पेशी घटल्या आणि नव्या पेशी तयार झाल्या. जे बदल तरूणांमध्ये होतात ते बदल या वयातल्या लोकांमध्ये पाहायला मिळाले.

त्यामुळे आमच्या पडताळणीत इस्रायलच्या संशोधकांनी केलेला दावा सत्य ठरलाय. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीनं आजवर अनेक अशक्य गोष्टी सत्यात उतरल्या आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान विकसीत झालं तर माणूस कधीच म्हातारा होऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT