Viral Video  Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : एक गोळी खाल, राहाल तरुण? गंभीर आजारही होतील दूर?, व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Special Report : आपण तरूण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र तुम्ही कायमस्वरूपी तरुण राहाल, तरतरीत रहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याता दावा सोशल मीडियात केला जातोय.

Sandeep Gawade

मयुरेश कडव, साम टीव्ही प्रतिनिधी

आपण तरूण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरूपी तरूण राहाल, तरतरीत रहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याता दावा सोशल मीडियात केला जातोय. याबाबतचा एक व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल होतोय. त्यात ही गोळी अत्यंत प्रभावी असल्याचं म्हंटलंय.. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा...

आपलं वय जसतसं वाढत जातं तसतसा उत्साह कमी कमी होत जातो. साठीनंतर अनेकांच्या हातात काठी येते. तर अनेकजण गंभीर आजारांचा सामना करत कसेबसे दिवस काढत जगताना दिसतात. बदलत्या जिवनशैलीमुळे आपलं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चाललंय. मात्र या सगळ्यावर रामबाण उपाय आल्याचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. एक गोळी जिच्यामुळे माणसाचं वय कमी होईल. शिवाय ही गोळी गंभीर स्वरूपाच्या आजारांनाही दूर ठेवेल असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहा.

वैद्यकिय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी एक क्रांतिकारी संशोधन केलंय. त्यांनी एक अशी गोळी तयार केलीय जिच्यामुळे माणूस कधीच म्हातारा होऊ शकत नाही. या गोळीचे कुत्र्यांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. एका 12 वर्षांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला कँन्सर होता. मात्र या गोळीमुळे तो पूर्णपणे बरा झाला. तर बँन्सन नावाच्या कुत्र्याची चालण्या-फिरण्याची क्षमता संपली होती मात्र या गोळीमुळे तो आता पूर्वीसारखाच चालू-फिरू लागलाय.

व्हायरल मेसेजमध्ये या गोळीबद्दल अनेक सकारात्मक दावे करण्यात आले आहेत. 2025 मध्ये माणसांवरही या गोळीच्या चाचण्या घेण्यात येतील असंही सांगण्यात आलंय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून याबाबत अधिक माहिती घेतली, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.

माणसानं कायमस्वरूपी तरूण राहावं यासाठी

टेलोमिर फार्मास्यिटीकल्स आणि क्लीवलँड क्लिनिकच्या माध्यमातून संशोधन सुरू आहेय. या संशोधनातून एक औषध तयार करण्यात आलं असून या औषधांची कुत्र्यांवर चाचणी घेण्यात आली. या औषधांचा कुत्र्यांच्या सेल्सवर परिणाम झाला. मात्र समोर आलेले निष्कर्ष हे केवळ प्राथमिक स्तरावरचे आहेत. माणसांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास असा कोणताही प्रयोग करण्यात आलेला नाही.

त्यामुळे आमच्या पडताळणीत माणसाला तरूण करणारी गोळी तयार झाल्याचा दावा असत्य ठरलाय. या औषधाबाबत निश्चितच संशोधन सुरू आहे. मात्र त्यातून कोणतेही ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत. हे संशोधन माणसांच्या बाबतीत कितपत प्रभावी ठरेल याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

Solapur Politics: उत्तम जानकरांनी खूप त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले; मोहिते पाटील यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT